Pune Municipal Corporation | आता विकास कामाचे डॉकेट IWMS प्रणाली द्वारेच करावे लागणार   | महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांचे आदेश

HomeBreaking Newsपुणे

Pune Municipal Corporation | आता विकास कामाचे डॉकेट IWMS प्रणाली द्वारेच करावे लागणार | महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांचे आदेश

Ganesh Kumar Mule Jul 28, 2023 1:54 AM

Pune Municipal Corporation Latest News | औद्योगिक दराच्या पाणी बिलाबाबत पुणे महापालिकेला दिलासा नाहीच! 
Rents of Mandi | मंडईतील गाळ्यांच्या भाडेवाढी विरोधात सर्व राजकीय पक्ष एकवटले | भाडेवाढ कायद्याच्या कसोटीवर अमान्य असल्याचा दावा 
Katraj-kondhva Road | कात्रज-कोंढवा रोड बाबतचा आयुक्तांचा दावा ठरला फोल!

Pune Municipal Corporation | आता विकास कामाचे डॉकेट IWMS प्रणाली द्वारेच करावे लागणार

| महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांचे आदेश

Pune Municipal Corporation | पुणे महानगरपालिकेतील (PMC Pune) विविध विभागांमार्फत  विकसित होणाऱ्या विकास कामांचे निविदा मान्यतेचे डॉकेट Intelligent Works Management System (IWMS) सॉफ्टवेअर प्रणालीद्वारेच करावे लागणार आहेत. महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) यांनी याबाबतचे आदेश सर्व विभागांना जारी केले आहेत. (Pune Municipal Corporation)

पुणे महानगरपालिकेमार्फत (PMC Pune) अंदाजपत्रकिय तरतुदी नुसार विविध विभागांमार्फत प्रकल्पीय, भांडवलीय आणि महसुली कामे निविदा प्रक्रियेतून (Tender Process) केली जातात. या  विकास कामांकरिता सुधारित संगणक प्रणाली (Intelligent Works Management System ) वापरण्यास मान्यता प्राप्त झाली आहे. यानुसार महापालिका आयुक्तांनी आदेश जारी केले आहेत. (Pune Municipal Corporation News)

आयुक्तांच्या आदेशानुसार पुणे महानगरपालिकेतील विविध विभागामार्फत विकसित होणाऱ्या विकास कामांचे निविदा मान्यतेचे डॉकेट IWMS सॉफ्टवेअर मार्फतच करण्यात यावे. तसेच ऑडीट व दक्षता विभागाकरिता तयार करण्यात आलेल्या चेकलिस्ट पूर्णपणे भरणेची जबाबदारी ज्या विभागामार्फत डॉकेट मान्येतेसाठी सादर करण्यात येते त्या विभागातील संबधित कनिष्ठ अभियंता यांची राहील. (PMC Pune News)

तसेच सर्व विकास कामांचे पूर्वगणक पत्रक ( पु.ग.प.), जी. आय. एस. मॅपिंग, प्रशासकीय मान्यता, लाँकिंग, तांत्रिक मान्यता, डीटीपी, निविदा जाहिरात, ऑडीट व दक्षता विभागाकरिता तयार करण्यात आलेल्या चेकलिस्ट, निविदा मान्यतेचे डॉकेट, कार्यादेश (वर्क ऑर्डर) आणि मोजमापक पुस्तके ( एम. बी.) इत्यादी कामे IWMS सॉफ्टवेअर मार्फतच करण्यात यावे. असेही आयुक्तांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.
——
News Title |Pune Municipal Corporation | Now the development work docket has to be done through IWMS system| Municipal Commissioner Vikram Kumar’s order