Pune Municipal Corporation Budget | दिव्यांगांचा आधार बनणार पुणे महापालिका! | दिव्यांगांसाठी विविध योजना प्रस्तावित
Pune Municipal Corporation Budget – (The Karbhari News Service) – पुणे शहरातील दिव्यांगांचा पुणे महापालिका (Pune Municipal Corporation (PMC) ही आधार बनणार आहे. दिव्यांगांसाठी महापालिकेच्या समाज विकास विभागाकडून (Pune Corporation SDD) बऱ्याच योजना चालवल्या जातात. त्यात अजून वाढ करून दिव्यांगांसाठी नवीन योजना आणल्या गेल्या आहेत. महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Vikram Kumar IAS) यांनी महापालिकेच्या बजेट (PMC Budget 2024-25) मध्ये प्रस्तावित योजनांसाठी तरतूद केली आहे. (PMC SDD)
– सद्यस्थितीत या राबवल्या जाताहेत दिव्यांग कल्याणकारी योजना
पुणे महापालिकेच्या समाज विकास विभागाकडून दिव्यांगांसाठी विविध योजना राबवण्यात येतात. यामध्ये दिव्यांगाना मोफत पीएमपीएमएल बसपास, कृत्रिम अवयव घेणे, स्वयंरोजगार, उच्च शिक्षण, प्रशिक्षणासाठी अर्थसहाय्य, महापालिका क्षेत्रातील १८ वर्षापुढील मतिमंद व्यक्तींचा सांभाळ करणाऱ्या महापालिका हद्दीतील नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेस अथवा मतिमंद व्यक्तीच्या पालकांस अर्थसहाय्य, दिव्यांग-दिव्यांग, दिव्यांग-अव्यंग व्यक्तींच्या विवाहासाठी अर्थसहाय्य, दिव्यांग व्यक्तींनी स्थापित केलेल्या कला पथकास वाद्य खरेदीसाठी अर्थसहाय्य, दिव्यांग व्यवसाय गटांनी सुरु केलेल्या व्यवसायाच्या वृद्धी करिता अर्थसहाय्य, दृष्टीहीनांसोबत मदतनीसाला पी.एम.पी.एम.एल. तिकिटात ५०% सवलत देणे, दिव्यांग व्यक्तींना वार्षिक अर्थसहाय्य दिले जाते.
– दिव्यांगांसाठी प्रस्तावित प्रकल्प योजना
– दिव्यांग नागरिकांच्या दुर्धर आजाराच्या उपचारासाठी १ लाखापर्यंत अर्थसहाय्य देणे.
– राष्ट्रीय व राज्यस्तरीय खेळामध्ये निवड झालेल्या दिव्यांग खेळाडूंना साहित्य खरेदीकरीता र.रु. ३०,०००/- पर्यंत अर्थसहाय्य देणे.
– दिव्यांग नागरिकांचे शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना अंतर्गत वार्षिक शुल्क र.रु. २००/- भरणे.
– शिक्षणाची आवड निर्माण होवून शैक्षणिक प्रगती होण्यासाठी व स्वबळावर उभे राहण्यासाठी दोन्ही पालक दिव्यांग असलेल्या पालकांच्या मुलांना व सव्यंग पालकांच्या दिव्यांग मुलांना इ. १ ली ते इ. १२ वीमध्ये शिक्षण घेत असताना शैक्षणिक खर्च म्हणून तसेच इ. १ ली ते इ. १० वी व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील दिव्यांग मुलांना शाळेत व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये जाण्यायेण्यासाठी अर्थसहाय्य देणे.
– स्वमग्नता, जॉजिस्टिक, किंवा मनोरुग्ण, वेगवेगळ्या प्रकारच्या दिव्यांगांना विकलांगांना त्यांच्या पालकांसाठी वैद्यकिय व शास्त्रीय समुपदेशन आयोजित करणे.