वकीलपत्रावर सही शिक्का मारण्याबाबत खातेप्रमुख उदासीन
| प्रशासनाला द्यावे लागले आदेश
विधी विभागाकडून सर्वोच्च न्यायालय / उच्च न्यायालय/ राष्ट्रीय हरित लवाद न्यायालय येथे महानगरपालिके तर्फे विरुद्ध केसेस दाखल होतात, त्याअनुषंगाने पुणे महानगरपालिके तर्फे विधी विभागाकडून संबंधित केसेस मध्ये वकिलांची नियुक्ती करून सदर केसबाबत खात्याचे वकीलपत्र तयार करून दिले जाते.
सदर वकीलपत्रावर संबंधित खातेप्रमुख यांची स्वाक्षरी होऊन त्या खाली त्यांचे नावाचा शिक्का मारणे आवश्यक आहे. याबाबत वारंवार सूचना करूनही खबरदारी घेतली जात नाही, तरी सदर परिपत्रकाची नोंद घेऊन संबंधित सर्व खातेप्रमुखांनी पुढील उचित कार्यवाही करावी. असे आदेश विधी विभागाकडून सर्व खाते प्रमुखांना देण्यात आले आहेत.