Pune Metro Station | पुणे मेट्रोचे खडकी मेट्रो स्थानक उद्यापासून प्रवासी सेवेत दाखल

Homeadministrative

Pune Metro Station | पुणे मेट्रोचे खडकी मेट्रो स्थानक उद्यापासून प्रवासी सेवेत दाखल

Ganesh Kumar Mule Jun 20, 2025 8:05 PM

Property Tax | PMC | पहिल्या दोन महिन्यांत 751 कोटी मिळकतकर जमा  : मागील वर्षी पेक्षा 190 कोटींनी अधिक 
PMC PT 3 Form | Pune Property Tax | PT-3 अर्ज भरून देण्याचा उद्याचा शेवटचा दिवस | मिळकत करातून महापालिकेला 1630 कोटींचे उत्पन्न प्राप्त
Maharashtra Best Agricultural State | मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला सर्वोत्कृष्ट कृषी राज्याचा पुरस्कार

Pune Metro Station | पुणे मेट्रोचे खडकी मेट्रो स्थानक उद्यापासून प्रवासी सेवेत दाखल

 

Pune Metro News – (The Karbhari News Service) – पुणे मेट्रोच्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी! पुणे मेट्रोचे खडकी मेट्रो स्थानक उद्या शनिवार, २१ जून २०२५ रोजी प्रवासी सेवेत दाखल होत आहे. (Pune News)

खडकी मेट्रो स्थानक हे पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील पिंपरी चिंचवड मनपा ते स्वारगेट या महत्त्वपूर्ण मार्गिकेवर स्थित आहे. हे स्थानक खडकी रेल्वे स्थानकाच्या अगदी जवळ असल्यामुळे व या मेट्रो स्थानकातून प्रवाश्याना थेट खडकी रेल्वे स्थानकात जाण्यासाठी मार्ग असल्यामुळे मेट्रो आणि रेल्वे या दोन्ही वाहतूक सेवांचे या ठिकाणी एकत्रीकरण शक्य झाले आहे. यामुळे या परिसरातील नागरिकांना तसेच रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पुणे मेट्रोच्या सेवेचा लाभ घेणे सुलभ होईल. प्रवाशांना सार्वजनिक वाहतुकीचा वापर करताना अधिक सोयीस्कर आणि अखंड प्रवासाचा अनुभव घेता येईल. हे स्थानक सुरु झाल्यामुळे प्रवाश्याना खडकी, पुणे विद्यापीठ, औंध आयटी पार्क, खडकी कॅन्टोन्मेंट, खडकी बाजार, रेंज हिल, औंध रस्ता, ऑर्डीनन्स फॅक्टरी हॉस्पिटल, मुळा रस्ता अश्या महत्वाच्या ठिकाणी पोहचणे सोयीस्कर होणार आहे.

या प्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी म्हंटले आहे कि, “पुणे मेट्रोच्या विस्तारात खडकी स्थानकाची भर पडल्याने पुणे व पिंपरी चिंचवड या जुळ्या शहरांना जोडणाऱ्या या रस्त्यावरील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक बळकट झाली आहे. खडकी, पुणे विद्यापीठ, औंध आयटी पार्क, खडकी कॅन्टोन्मेंट, खडकी बाजार, रेंज हिल, औंध रस्ता, ऑर्डीनन्स फॅक्टरी हॉस्पिटल, मुळा रस्ता ठिकाणी राहणाऱ्या व कामासाठी येणाऱ्या नागरिकांना या स्थानकाचा फायदा होणार आहे.”

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0