Pune Metro Security Guard  | मेट्रोच्या सुरक्षा रक्षकाने प्रसंगावधान राखत दोन जीव वाचवले

HomeBreaking Newsपुणे

Pune Metro Security Guard  | मेट्रोच्या सुरक्षा रक्षकाने प्रसंगावधान राखत दोन जीव वाचवले

गणेश मुळे Jan 19, 2024 4:10 PM

Shivajinagar Bus Station Pune | अडीच वर्षात शिवाजीनगर येथील बसस्थानाकाचे काम पूर्ण होणार!
Rights of Rivers Campaign | मुळा, मुठा सहित पुणे जिल्ह्यातील 7 नद्यांसाठी राईट्स ऑफ रिव्हर्स मोहीम
My Bharat | National Youth Day | राष्ट्रीय युवा दिन सप्ताहात पुणे महानगरपालिका व स्वयंसेवी संस्थाचे एकूण  ३८ उपक्रमांचे आयोजन

Pune Metro Security Guard  | मेट्रोच्या सुरक्षा रक्षकाने प्रसंगावधान राखत दोन जीव वाचवले

 

Pune Metro Security Guard  |पुणे मेट्रो (Pune Metro) सुरक्षा रक्षक विकास बांगर (Security Guard Vikas Bangar) याने प्रसंगावधान राखत ३ वर्षांच्या मुलाचे व त्याच्या आईचे प्राण वाचवले. आज  १९ जानेवारी  रोजी दुपारी २:२२ मिनिटांनी सिव्हिल कोर्ट उन्नत मेट्रो स्थानक (Civil Court Metro Station) येथे फलाट क्रमांक २ वरून एक 3 वर्षाचा मुलगा खेळतांना रुळावर पडला. त्यावेळी कामावर असणाऱ्या सुरक्षारक्षकाने मुलाला ट्रॅक वर पडताना पहिले. पडणाऱ्या मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात मुलाची आई देखील रुळांवर पडली. त्यावेळी प्रसंगावधान राखत सुरक्षारक्षक विकास बांगर याने फलाटावरील आपत्कालीन मेट्रो थांबविण्याचे प्लंजर (ई.एस.पी) बटन वेळीच दाबले. (Pune Metro Security Guard)

त्यामुळे स्थानकाच्या दोन्ही दिशांनी वेगाने येणाऱ्या मेट्रो ट्रेन त्वरित थांबल्या यावेळी स्थानक आणि मेट्रो यामधील अंतर केवळ ३० मीटर इतके होते. मेट्रो ट्रेन थांबल्यानंतर मुलगा व त्याच्या आईला सुखरूप रित्या रुळांवरून बाहेर काढण्यात आले व परिवाराशी त्याची भेट करून देण्यात आली.

सुरक्षारक्षक  विकास बांगर यांच्या समयसूचकतेबद्दल आणि धाडसी कार्याबद्दल पुणे मेट्रोचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत सोनवणे (प्रशासन व जनसंपर्क), महाव्यवस्थापक सोमेश शर्मा (वित्त) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी स्थानक नियंत्रक व पुणे मेट्रोचे कर्मचारी उपस्थित होते.