Pune Metro | बिहार निवडणुकीच्या तोंडावर पुणेकरांची मेट्रो पळवली!
| पाटणा मेट्रोसाठी राखीव ट्रेन भाड्याने – प्रथमेश आबनावे, सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस
Bihar Election – (The Karbhari News Service) – पुणे मेट्रोसाठी आवश्यक असलेल्या ३४ मेट्रो ट्रेन संचांपैकी एक राखीव संच (तीन डब्यांची मेट्रो ट्रेन) महा मेट्रो रेल कॉर्पोरेशनने पाटणा मेट्रो प्रकल्पासाठी भाडे तत्वावर पाठवला आहे. सदर ट्रेन आता बिहारमधील गीता गड येथील डिपोत पोहोचली आहे, आणि १५ ऑगस्ट २०२५ रोजी पाटणा मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी त्याचा वापर होणार आहे, अशी अधिकृत माहिती आहे. असा आरोप महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रथमेश आबनावे यांनी केला आहे. (Prathmesh Abnave Youth Congress)
नेमकं काय घडलं आहे?
पुणे मेट्रोसाठी एकूण ३४ ट्रेन संचांची आवश्यकता आहे.
आजघडीला फक्त ३३ संच पुणे महा मेट्रोकडे उपलब्ध आहेत.
त्यातील एक संच राखीव स्वरूपात तांत्रिक अडचणी व आपत्कालीन स्थितीसाठी ठेवलेला होता.
हा राखीव संच पुण्याच्या वापराऐवजी पाटणा मेट्रोला ३ वर्षांसाठी भाड्याने देण्यात आला.
ही मेट्रो ट्रेन (बिहार) येथे पोहोचली असून, तिथे सध्या ट्रायलची तयारी सुरू आहे.
पुण्यातील गरजा काय आहेत?
सध्या पुण्यातील दररोज सरासरी १.८० लाख प्रवासी मेट्रोचा वापर करत आहेत.
फ्रिक्वेन्सी वाढवणे, प्लॅटफॉर्मवरील गर्दी कमी करणे, आणि यशस्वी प्रवासी अनुभव देणे यासाठी राखीव संच अत्यावश्यक आहे.
याशिवाय लवकरच नवीन मार्ग सुरू होणार आहेत.हे मार्ग सुरू होताच पुण्याला अधिक गाड्यांची गरज भासणार आहे.
युवक काँग्रेसचा रोष
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रथमेश आबनावे यांनी या निर्णयावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.त्यांनी स्पष्ट सांगितले की,
> “पुणेकरांना वाढती गर्दी, कमी फ्रिक्वेन्सी आणि उशीर यांचा रोजचा त्रास होत आहे. अशा वेळी पुण्याच्या सेवेसाठी राखून ठेवलेली ट्रेन पाटणाला पाठवणे म्हणजे पुणेकरांच्या हक्कावर डल्ला आहे. ही मेट्रो बिहार निवडणुकीपूर्वी सुरू होणाऱ्या मेट्रोसेवेचे श्रेय घेण्यासाठी पळवण्यात आली आहे.”
ते पुढे म्हणाले की, “जर ही मेट्रो तात्काळ पुण्यात परत आणली नाही, तर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस महा मेट्रो कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करेल.”
📉 राजकीय संदर्भ
पाटणा मेट्रोसाठी सध्या स्वतःची मेट्रो ट्रायल युनिट उपलब्ध नव्हती. त्यामुळे पुण्याची ट्रायल ट्रेनच “तात्पुरती” मागवली गेली, आणि ती लगेच पाठवण्यात आली.
हा निर्णय १५ ऑगस्टला पाटणा मेट्रो सेवा सुरू करण्याच्या उद्देशाने घेतला गेला आहे, असा संशय व्यक्त करण्यात येतो आहे.
❓ महत्त्वाचे प्रश्न
हा निर्णय घेताना पुण्याचे खासदार, आमदार, पालकमंत्री किंवा नागरी प्रतिनिधी यांना विश्वासात घेतले गेले का?
भाडेकराराचे अटी काय आहेत?
पुण्यासाठी नवीन ट्रेन संच कधी मागवले जाणार?
ही मेट्रो परत येणार आहे का?
पुण्याची मेट्रो सेवा अजून अपूर्ण आहे. प्रवासीसंख्या वाढत आहे. नवीन मार्ग सुरू होणार आहेत. अशा वेळेस ही मेट्रो पाठवणे म्हणजे पुण्याच्या विकासाला मागे टाकणे आणि बिहारसारख्या राज्याच्या राजकीय अजेंड्यासाठी महाराष्ट्राच्या लोकसेवेला दुय्यम स्थान देणे होय. असे आबनावे यांनी म्हटले आह.ए

COMMENTS