Pune Metro Property Tax | पुणे मेट्रो कडून मेट्रो स्टेशनची माहिती पुणे महापालिकेला मिळेना | प्रॉपर्टी टॅक्स निर्धारण करण्यात महापालिकेला अडचणी

HomeपुणेBreaking News

Pune Metro Property Tax | पुणे मेट्रो कडून मेट्रो स्टेशनची माहिती पुणे महापालिकेला मिळेना | प्रॉपर्टी टॅक्स निर्धारण करण्यात महापालिकेला अडचणी

Ganesh Kumar Mule Sep 23, 2023 2:29 AM

PMC Assistant Sports Officer | सहाय्यक क्रीडा अधिकारी पदावर यांना मिळाली पदोन्नती | अतिरिक्त आयुक्तांनी जारी केले आदेश 
PMC Employees Yoga Meditation | पुणे महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी उद्या योग ध्यान कार्यक्रमाचे आयोजन
MNS Pune | PMC Road Work | रस्त्यांच्या चुकीच्या कामामुळे पावसाळ्यात घरात आणि दुकानात पाणी जाण्याची शक्यता! 

Pune Metro Property Tax | पुणे मेट्रो कडून मेट्रो स्टेशनची माहिती पुणे महापालिकेला मिळेना | प्रॉपर्टी टॅक्स निर्धारण करण्यात महापालिकेला अडचणी

Pune Metro Property Tax | पुणे मेट्रो (Pune Metro) कडून काही मार्गांवर मेट्रो सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी मेट्रो कडून जवळपास 11 मेट्रो स्टेशन (Pune Metro Station) बांधण्यात आले आहेत. शिवाय तिथल्या काही मिळकती भाडे तत्वावर देखील दिल्या आहेत. असे असले तरी अजूनही मेट्रोकडून पुणे महापालिकेला (Pune Municipal Corporation) प्रॉपर्टी टॅक्स (Property tax) अदा केला जात नाही. स्टेशन बाबतची सर्व माहिती महापालिकेने मेट्रोला मागितली आहे. वर्षभरपासून महापालिकेचा पाठपुरावा सुरु आहे. तरीही महापालिकेला माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे महापालिका कर निर्धारण करू शकत नाही. परिणामी महापालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे. मेट्रो याबाबत गंभीर दखल घेणार का, असा प्रश्न महापालिकेकडून विचारला जात आहे. (Pune Metro Property Tax)

पुणे महानगरपालिकेच्या (PMC Pune) हद्दीत मेट्रो रेल स्टेशन कार्यान्वित करण्यात आलेले आहेत. केंद्र सरकारच्या मिळकतींची आकारणी केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार भांडवली मूल्यावर (Capital Value) केली जाते. तसेच राज्य शासनाच्या मिळकतींची आकारणी चटई क्षेत्रावर (FSI) केली जाते. या कामी पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील कार्यान्वित मेट्रो रेल स्टेशन मिळकतीना पुणे
महानगरपालिकेचे (Pune Municipal Corporation) सेवाशुल्क आकारणी करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने मेट्रो स्टेशनचे नाव, वापरातील क्षेत्रफळ, भांडवली मूल्य इत्यादी संपूर्ण माहिती कर आकारणी कार्यालयाकडे सादर करणेबाबत महापालिकेकडून मेट्रोला 2022 मध्ये  कळविण्यात आलेले आहे. तथापि, अद्याप कोणतीही माहिती महापालिकेला प्राप्त झालेली नाही. त्यामुळे महापालिकेने  पुन्हा मेट्रोला स्मरणपत्र दिले. कारण  मिळकती आकारणीसाठी पात्र असल्याने मिळकत कर आकारणी आवश्यक आहे. याबाबत वेळोवेळी विस्तारीत होणाऱ्या मेट्रो स्टेशन बाबतची संपूर्ण माहिती टॅक्स विभागाला द्यावी असे पत्रात म्हटले आहे. मात्र पुणे मेट्रोने महापालिकेला कसलाही प्रतिसाद दिलेला नाही. यावरून मेट्रोची उदासीनता दिसून येत आहे.

—-/—
News Title | Pune Metro Property Tax | Pune Municipal Corporation did not get information about metro stations from Pune Metro Difficulties for the Municipal Corporation in determining property tax