Pune Metro | PMC Pune | पुणे मेट्रो आणि पुणे मनपा यांच्या सहयोगाने येरवडा मेट्रो स्थानकाचे नाविन्यपूर्ण नियोजन

HomeपुणेBreaking News

Pune Metro | PMC Pune | पुणे मेट्रो आणि पुणे मनपा यांच्या सहयोगाने येरवडा मेट्रो स्थानकाचे नाविन्यपूर्ण नियोजन

कारभारी वृत्तसेवा Dec 11, 2023 2:20 PM

Single Use Plastic | प्लास्टिक बाबत कठोर कारवाई न करता आधी जनजागृती करा  | व्यापारी संघटनांची महापालिकेला सूचना 
Lokmanya Tilak | लोकमान्यांचे कार्य सद्यस्थितीतही प्रेरणादायी | माजी आमदार मोहन जोशी
Pune Municipal Corporation Latest News | | PMC employees and officers suffering from the work of seniors!

Pune Metro | PMC Pune | पुणे मेट्रो आणि पुणे मनपा यांच्या सहयोगाने येरवडा मेट्रो स्थानकाचे नाविन्यपूर्ण नियोजन

Pune Metro | PMC Pune |पुणे मेट्रो प्रकल्पातील (Pune Metro Project) रुबी हॉल ते रामवाडी या मार्गीकेवरील स्थानकांची कामे जवळपास पूर्ण होत आली आहे. उर्वरित कामे पूर्ण करून हा मार्ग लवकरच प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या मार्गावर येरवडा हे महत्त्वाचे स्थानक असून, हा भाग दाट लोकवस्तीचा आहे. येरवडा मेट्रोस्थानक सुरू झाल्यानंतर या परिसरातील हजारो नागरिकांना याचा फायदा होणार आहे. (Pune Metro | PMC Pune)

येरवडा स्थानक हे पुणे – नगर या राष्ट्रीय महामार्गावर असून तेथे प्रचंड प्रमाणात वाहनांची निरंतर वाहतूक सुरू असते. येरवडा मेट्रो स्थानकात प्रवेश व बाहेर बाहेर पडण्याची रचना तेथील वाहतुकीला सुसंगत व पूरक अशी करण्यात आली आहे. यामुळे येथील होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यास याची मदत होईल. पुणे मेट्रो व पुणे मनपा यांनी नुकताच यासंबंधी आराखडा बनविला आहे व त्या आराखड्यानुसार लवकरच काम पूर्ण करण्यात येईल.

येरवडा मेट्रोचा स्थानकाच्या दोन्ही बाजूला लिफ्ट, सरकते जिने (एस्केलेटर) आणि पादचारी जिने बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे येरवडा मेट्रो स्थानक सुरू झाल्यानंतर होणाऱ्या संभाव्य गर्दीवर नियंत्रण ठेवता येईल तसेच प्रवाशांना चांगली सेवा देता येईल.

येरवडा मेट्रो स्थानकापासून पुणे विमानतळ जवळपास ४.८ किमी अंतरावर असून त्यामुळे येरवडा मेट्रो स्थानक ते विमानतळ अशी फिडर बस सेवा पीएमपीएमएलच्या सहकार्याने चालविण्यात येणार आहे. विमानतळ विशेष फिडर बस थांबण्यासाठी व दोन बस बेचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांना मेट्रो मधून उतरल्यावर लगेचच विमानतळ बस सेवेचा लाभ घेऊन विमानतळावर जाणे सोयीचे होईल.

मेट्रो स्थानकाच्या दुसऱ्या बाजूला (वार्ड ऑफिसच्या बाजूला) महापालिकेची जागा असून तेथे पीएमपीएमएल बस व एमएसआरटीसी बस थांबा करण्यात येणार आहे. जेणेकरून बस थांबलेली असताना महामार्गावरील वाहनांना अडथळा होणार नाही.

याप्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्री. श्रावण हर्डीकर (भाप्रसे) म्हणाले की, ‘पुणे मेट्रो आणि पुणे मनपा यांच्या संयुक्त नियोजन करून येरवडा स्थानकाचा आराखडा वैशिष्ट्यपूर्ण बनविला आहे. त्यामुळे रस्त्यावरची कोंडी कमी होणार आहे तसेच येरवडा स्थानक वापरणाऱ्या प्रवाशांना मल्टी मॉडेल इंटिग्रेशन चा फायदा होणार आहे तसेच विमानतळासाठी कनेक्टिव्हिटी सुधारून प्रवास जलद होणार आहे’.