Pune Metro News | पुणे मेट्रोच्या रामवाडी ते वाघोली आणि वनाज ते चांदणी चौक या उन्नत मार्गिकांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी | ३६२४.२४ कोटी खर्च अपेक्षित
Pune Metro Route – (The Karbhari News Service) – पुणे मेट्रोची प्रगती पुण्याची ‘लाईफलाईन’ बनण्याकडे चालली आहे. तब्बल १ लाख ७० हजार प्रवासी पुणे मेट्रोचा दररोज वापर करत आहेत. आज, २५ जून २०२५ रोजी, केंद्रीय मंत्रिमंडळाने पुणे मेट्रोच्या वनाज ते चांदणी चौक (मार्गिका २अ) आणि रामवाडी ते वाघोली/विठ्ठलवाडी (मार्गिका २ब) या महत्त्वाच्या मार्गिकांना मंजुरी दिली आहे.यामुळे पुणे शहरातील नागरिकांना शहराच्या पूर्व – पश्चिम भागात प्रवास करणे आणखी सोयीचे व आरामदायक होणार आहे. (Pune News)
वनाज ते चांदणी चौक (मार्गिका २अ) या विस्तारित मार्गावर २ स्थानके (कोथरूड बस डेपो, चांदणी चौक) असून, त्याची लांबी १.२ किमी असणार आहे. यामुळे वनाज ते चांदणी चौक परिसरातील नागरिकांना मेट्रोची सुविधा उपलब्ध होईल.
रामवाडी ते वाघोली/विठ्ठलवाडी (मार्गिका २ब) या मार्गावर ११ स्थानके (विमान नगर, सोमनाथ नगर, खराडी बायपास, तुळजाभवानी, उबाळे नगर, अप्पर खराडी रोड, वाघेश्वर मंदिर, वाघोली, सिद्धार्थ नगर, बकोरी फाटा, विठ्ठलवाडी) असतील आणि त्याची लांबी ११.६३ किमी असेल. या विस्ताराने वाघोली आणि विठ्ठलवाडी हा भाग मेट्रोने उर्वरित शहराला जोडला जाणार आहे.
या दोन्ही उन्नत मार्गिकांची एकूण लांबी १२.७५ किमी असून, यामध्ये १३ नवीन स्थानके जोडली जातील. या संपूर्ण प्रकल्पाचा एकूण खर्च ३६२४.२४ कोटी रुपये अपेक्षित असून, तो पूर्ण होण्यासाठी अंदाजे ४ वर्षांचा कालावधी लागेल.
या प्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी म्हटले आहे की, “या दोन्ही मार्गिकांमुळे पुणे शहराचे मोठ्या प्रमाणावर विस्तारित पूर्व व पश्चिम भाग मेट्रोने उर्वरित शहराशी जोडला जाणार आहे. या भागातील हजारो नागरिकांना याचा फायदा होणार आहे.”
Union Cabinet Approves Pune Metro’s Elevated Corridors from Ramwadi to Wagholi and Vanaz to Chandani Chowk
Pune Metro is steadily becoming the ‘lifeline’ of Pune. With nearly 1.7 lakh commuters using the service daily, it is steadily transforming the way the city commutes. On 25th June 2025, the Union Cabinet approved two important elevated extensions of Pune Metro: Vanaz to Chandani Chowk (Corridor 2A) and Ramwadi to Wagholi/Vitthalwadi (Corridor 2B). These developments will further ease and enhance travel between the eastern and western parts of Pune city.
The Vanaz to Chandani Chowk (Corridor 2A) extension will include 2 stations – Kothrud Bus Depot and Chandani Chowk – and will span 1.2 km, providing metro connectivity to residents of the Vanaz–Chandani Chowk stretch.
The Ramwadi to Wagholi/Vitthalwadi (Corridor 2B) extension will comprise 11 stations – Viman Nagar, Somnath Nagar, Kharadi Bypass, Tuljabhavani, Ubale Nagar, Upper Kharadi Road, Wagheshwar Mandir, Wagholi, Siddharth Nagar, Bakori Phata, and Vitthalwadi – covering a total stretch of 11.63 km. This expansion will effectively connect Wagholi and Vitthalwadi to the rest of the city via metro.
Together, both these elevated corridors will add 12.75 km to the Pune Metro network and introduce 13 new stations. The estimated total cost of the project is ₹3,624.24 crores, with a projected completion timeline of approximately 4 years.
On this occasion, Shravan Hardikar, Managing Director of Maha Metro, said, “These two corridors will significantly connect the extended eastern and western regions of Pune city to the rest of the metro network. Thousands of citizens residing in these areas will greatly benefit from this expansion.”
COMMENTS