Pune Metro Income | ऑगस्ट महिन्यात 3 कोटींचे उत्पन्न | पुणे मेट्रोला पुणेकरांचा भरभरून प्रतिसाद

HomeBreaking Newsपुणे

Pune Metro Income | ऑगस्ट महिन्यात 3 कोटींचे उत्पन्न | पुणे मेट्रोला पुणेकरांचा भरभरून प्रतिसाद

Ganesh Kumar Mule Aug 31, 2023 2:00 PM

Pune Metro | छत्रपती संभाजी उद्यान आणि डेक्कन स्थानके त्यांच्या विशिष्ठ रचनेमुळे विलोभनीय ठरणार
Pune Metro Travel with Cycle | पुणे मेट्रोत सायकल घेऊन प्रवास करू शकता का? जाणून घ्या सविस्तर
Pune Metro | New Year 2024 | नवीन वर्षाच्या निमित्ताने पुणेकरांना पुणे मेट्रोची भेट 

Pune Metro Income | ऑगस्ट महिन्यात 3 कोटींचे उत्पन्न | पुणे मेट्रोला पुणेकरांचा भरभरून प्रतिसाद

Pune Metro Income | पुणे मेट्रोला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळताना दिसत आहे. १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट पर्यंत २०,४०,४८४ प्रवासी ट्रिप (३१ ऑगस्ट २३, दुपारी ४ पर्यंत) झाल्या. तर  १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट पर्यंत ३,०७,६६,४८१ रुपये उत्पन्न (३१ ऑगस्ट २३, दुपारी ४ पर्यंत) मिळाले. म्हणजे
सरासरी दरदिवशी ६५,८२२ मेट्रो प्रवास (ट्रिप) झाला. अशी माहिती पुणे मेट्रोच्या वतीने देण्यात आली. (Pune Metro Income)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ ऑगस्ट २०२३ रोजी फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट आणि गरवारे ते रुबी हॉल क्लीनिक या विस्तारित मेट्रो मार्गाचे उदघाटन केले. या विस्तारित मार्गाची लांबी ११.५ किमी असून डेक्कन जिमखाना, छत्रपती संभाजी उद्यान, पीएमसी, सिव्हिल कोर्ट (उन्नत), मंगळवार पेठ, पुणे रेल्वे स्थानक, रुबी हॉल क्लीनिक, दापोडी, बोपोडी, शिवाजीनगर, सिव्हिल कोर्ट (भूमिगत), हि अकरा स्थानके प्रवाश्यांसाठी खुली करण्यात आली.  (Metro Trip)
१ ऑगस्टला सायंकाळी पाच वाजेनंतर मोठ्या प्रमाणावर प्रवासी विस्तारीत मार्गावर प्रवास करण्यासाठी येऊ लागले. गेल्या १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या काळात २० लाखापेक्षा जास्त प्रवासी ट्रिप पुणेकरांनी केल्या. सरासरी एका दिवसात ६५ हजार पेक्षा जास्त प्रवास सकाळी ६ ते रात्री १० या काळात केले. शनिवारी व रविवारी मोठ्या संख्येने पुणेकरांनी मेट्रोतून प्रवास केले. प्रत्येक रविवारी एकूण प्रवास संख्या १ लाखापेक्षा जास्त होते. ऑगस्ट महिन्यात सर्वात जास्त प्रवासी संख्या १५ ऑगस्ट या दिवशी होती. या दिवशी १ लाख ६९ हजार ५१२ प्रवासी मेट्रो ट्रिप नोंदविण्यात आल्या. दिनांक १ ते ३१ ऑगस्ट २०२३ या काळात महिन्याला ३,०७,६६,४८१ रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळाले. सरासरी उत्पन्न ९ लक्ष ७८ हजार ७८३ रुपये इतके मेट्रोला मिळत आहे. (Pune Metro News)
मेट्रो स्थानकांचा विचार करता पीसीएमसी ते सिव्हिल कोर्ट या मार्गावर सर्वात जास्त २,००,००३ प्रवासी संख्या पीसीएमसी स्थानकावर नोंदवण्यात आली. तर या मार्गावरील सर्वात कमी १०,४३२ प्रवासी संख्या कासारवाडी या स्थानकात नोंदवली. वनाझ ते रुबी हॉल क्लीनिक या मार्गावर वनाझ स्थानकात सर्वात जास्त १,५३,२३५ प्रवास संख्या नोंदवली गेली. तर आयडियल कॉलोनी स्थानकात सर्वात कमी २०,५१२ प्रवासी संख्या नोंदविली गेली.
एकूण तिकीट विक्रींपैकी ५३.४१ % पुणेकरानी इलेक्ट्रॉनिक पेमेंट द्वारे तिकीट खरेदी केली. उर्वरित ४६.५९ % लोकांनी प्रत्यक्ष रोखीने पेपर तिकीट खरेदी केले. पेपर तिकीट घेणाऱ्या ८६ % लोकांनी तिकीट खिडकीतून तर १४ % लोकांनी मेट्रो किऑस्क मधून तिकीट घेतले. डिजिटल तिकीट घेणाऱ्यांपैकी ६८% लोकांनी मोबाईलद्वारे तिकीट खरेदी केले. ८ % लोकांनी मेट्रो कार्डद्वारे तिकीट खरेदी केले, २३ % लोकांनी किऑस्क मशीनद्वारे तर १ % लोकांनी टॉम (TOM – तिकीट ऑपरेटिंग मशीन) मध्ये तिकीट खरेदी केले. साधारणतः २७% लोकांनी “रिटर्न जर्नी” चे तिकीट घेतले असे निदर्शने आले आहे.
मेट्रोचे “एक पुणे कार्ड” पहिल्या १५००० लोकांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे. आत्तापर्यंत ११००० कार्डची विक्री झालेली आहे. तदनंतर कार्डची किंमत १७७ रुपये अशी असणार आहे. सध्या मेट्रो प्रवाशांसाठी शनिवार व रविवार प्रवासी भाड्यामध्ये ३० % सवलत आहे. तसेच कार्डचा वापर करणाऱ्यांसाठी दररोज १० % सवलत लागू आहे.
विद्यार्थ्यांसाठी (पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या) भाड्यामध्ये ३० % सवलत आहे. लवकरच पुणे मेट्रो विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्ड उपलब्ध करून देणार आहे.
पुण्यामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी मेट्रो आणि पीएमपीएलचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक सचिंद्र प्रताप सिंह यांच्या पुढाकाराने  फिडर बस सेवा सुरू केली आहे. सध्या ही सेवा पीसीएमसी, भोसरी, दापोडी, शिवाजीनगर, सिव्हिल कोर्ट, पुणे रेल्वे स्टेशन, वनाझ  या स्थानकांवर उपलब्ध आहे. तसेच पुणे आरटीओ श्री संजीव भोर यांच्या पुढाकाराने शेअर रिक्षा पीसीएमसी, संत तुकाराम नगर, भोसरी, कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी, बोपोडी शिवाजीनगर, सिव्हिल कोर्ट, पुणे रेल्वे स्टेशन, रुबी हॉल क्लिनिक, मंगळवार पेठ, पीएमसी, गरवारे कॉलेज, नल स्टॉप, आयडियल कॉलनी, आनंदनगर, वनाझ या स्थानकांतून चालवण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामुळे मेट्रोची फर्स्ट आणि लास्ट माईल कनेक्टिव्हिटीमध्ये सुधारणा होत आहे.
या प्रसंगी महाराष्ट्र मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी म्हटले आहे की “मेट्रोमुळे पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या सक्षमीकरणांमध्ये मोठा हातभार लागला आहे. पीएमपीएल आणि मेट्रो यांच्या सामंजस्याने अधिक मार्गांवर फिडर बस सेवा सुरू करण्यात येणार आहे.”या प्रसंगी महाराष्ट्र मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी म्हटले आहे की “मेट्रोमुळे पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या सक्षमीकरणांमध्ये मोठा हातभार लागला आहे. पीएमपीएल आणि मेट्रो यांच्या सामंजस्याने अधिक मार्गांवर फिडर बस सेवा सुरू करण्यात येणार आहे.”
——