Pune Metro | पुणे मेट्रोसाठी येरवड्यातील ४८,६०० चौ.मी. जमीन पीएमआरडीएला हस्तांतरित

Homeadministrative

Pune Metro | पुणे मेट्रोसाठी येरवड्यातील ४८,६०० चौ.मी. जमीन पीएमआरडीएला हस्तांतरित

Ganesh Kumar Mule Oct 17, 2025 10:20 PM

Rohit Pawar | Chandrashekhar Bawankule | रोहित पवारांना वाटते मीच वारसदार! | चंद्रशेखर बावनकुळे यांचा टोला 
Chandrashekhar Bawankule Vs Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे यांना मत म्हणजे हिंदू सनातन धर्म संपवण्याची वल्गना करणाऱ्यांना मत | भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका
Dilip Vede patil | दिलीप वेडेपाटील यांच्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोपवली महत्वाची जबाबदारी! 

Pune Metro | पुणे मेट्रोसाठी येरवड्यातील ४८,६०० चौ.मी. जमीन पीएमआरडीएला हस्तांतरित

 

| महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने महत्त्वपूर्ण निर्णय

Pune Metro Line 3 – (The Karbhari News Service) – पुण्यातील हिंजवडी ते शिवाजीनगर (मेट्रो लाईन-३) या महत्त्वाकांक्षी मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला येरवडा येथील ४८,६०० चौ.मी. शासकीय जमीन कायमस्वरुपी हस्तांतरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. ही जमीन मेट्रो प्रकल्पासाठी लागणारा व्यवहार्यता तफावत निधी (Viability Gap Funding – VGF) उभारण्यासाठी वापरली जाणार आहे. (Pune Metro News)

येरवडा (ता. पुणे शहर) येथील विविध सिटी सर्व्हे क्रमांकांमधील एकूण ४८,६०० चौ.मी. जमीन पीएमआरडीएला देण्यात आली आहे. यामध्ये सिटीसर्वे २२०१ मधील १४,८८० चौ.मी., सिटीसर्वे २२१६ मधील १५,६६०.१ चौ.मी. आणि सिटीसर्वे २२२० मधील १५,९५४ चौ.मी. क्षेत्राचा समावेश आहे. ही जमीन भांबुर्डा येथील १० हे. ६० आर जागेच्या बदल्यात पर्यायी जागा म्हणून हस्तांतरित करण्यात आली आहे.

यासाठी शासनाने काही अटी घातल्या असून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ आणि नियम १९७१ नुसार, ही जमीन मोफत आणि कायमस्वरुपी कब्जेहक्काने देण्यात आली आहे. पीएमआरडीएने ही जमीन भोगवटादार वर्ग-२ म्हणून धारण करावी. जमिनीच्या व्यावसायिक विकासातून मिळणारे उत्पन्न शासनाच्या व्यवहार्यता तफावत निधीसाठी वापरले जाईल.

सिटीसर्वे २२२० वरील शिक्षण संकुलाचे आरक्षण नगर विकास विभागाने लवकर बदलावे. जमिनीचा वापर केवळ मेट्रो प्रकल्पासाठीच करणे बंधनकारक आहे. अटींचा भंग झाल्यास जमीन शासन जमा करू शकते. पुणे जिल्हाधिकारी यांना जमीन हस्तांतरणापूर्वी पीएमआरडीएकडून लेखी हमीपत्र घ्यावे लागेल.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: