Pune Mayor Election | पुणे शहराचा पहिला नागरिक ठरणार ६ फेब्रुवारीला!

Homeadministrative

Pune Mayor Election | पुणे शहराचा पहिला नागरिक ठरणार ६ फेब्रुवारीला!

Ganesh Kumar Mule Jan 24, 2026 2:11 PM

Aba Bagul Parvati Vidhansabha | ‘पर्वती’ साठी आबा बागुल यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल | पर्वती विधानसभा मतदारसंघातून लढत आता रंगतदार होणार
Guardian ministers | चंद्रकांत पाटील पुण्याचे पालकमंत्री | नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर
Prithviraj Chavan Congress | निवडणूक रोखे व अन्य माध्यमातून जमा पैशाचा पश्‍चिम महाराष्ट्रात भाजपाकडून मोठ्या प्रमाणात वापर |  पृथ्वीराज चव्हाण यांचा पत्रकार परिषदेत गंभीर आरोप

Pune Mayor Election | पुणे शहराचा पहिला नागरिक ठरणार ६ फेब्रुवारीला!

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – गेल्या ४ वर्षांपासून ज्या गोष्टीची आतुरता होती, ती आता अस्तित्वात येणार आहे. तब्बल ४ वर्षांनी महापालिकेचे सभागृह भरणार आहे. शहराचा पहिला नागरिक अर्थात महापौर आता निवडला जाणार आहे. त्यासाठीच निवडणूक प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे. महापौर निवडी सोबतच उपमहापौर देखील निवडला जाणार आहे. (Pune’s first Citizen)

महापौर पद हे महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. त्यामुळे पहिला नागरिक ही महिला असणार हे या आधीच निश्चित झाले आहे. भाजपचे सुमारे ११९ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यात महिलांची संख्या बरीच आहे: यातून पहिल्या नागरिकासाठी कुणाला संधी दिली जाणार? नवीन चेहऱ्याला की जे बऱ्याच वेळा निवडून आले, त्यांना दिली जाणार. हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. मागील पंचवार्षिक मध्ये मुक्ता टिळक आणि मुरलीधर मोहोळ यांना महापौर पदाची संधी मिळाली होती. (Pune Municipal Corporation – PMC)

पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकी नंतर पहिली सभा म्हणजेच महापौर, उपमहापौर यांची निवडणूक घेणे याबाबत तारिख, वेळ आणि सभेच्या अध्यक्षस्थानी पिठासीन अधिकारी यांच्या निश्चिती करिता विभागीय आयुक्त यांचेकडे पत्र पाठविण्यात आले होते. विभागीय आयुक्त यांचेशी झालेल्या चर्चेनुसार महापौर, उपमहापौर यांची निवडणूक घेणे याकरिता शुक्रवार ६ फेब्रुवारी ही तारिख निश्चित करण्यात आलेली आहे.

– पिठासीन अधिकारी बाबत स्वतंत्र पत्र येणार

ही पहिली विशेष सभा शुक्रवार, ६ फेब्रुवारी रोजी, सकाळी ११.०० (अकरा) वाजता घेण्यात येईल. याबाबतचा कार्यक्रम लवकरच जाहीर करण्यात येईल. दरम्यान पीठासीन अधिकारी कोण असणार, याबाबत विभागीय आयुक्त कार्यालया कडून अजून सांगण्यात आले नाही. याबाबत स्वतंत्र पत्र येईल. असे महापालिका आयुक्त कार्यालयांकडून सांगण्यात आले.

| महापौर बंगल्याची रंगरंगोटी सुरू!

दरम्यान महापौर निवडी सोबतच आता महापौर यांना राहण्यासाठी जो बंगला निर्माण करण्यात आला आहे: त्याची रंगरंगोटी देखील सुरु करण्यात आली आहे. हे काम भवन रचना विभाग, विद्युत विभाग आणि उद्यान विभाग एकत्रित मिळून करत आहेत. बंगल्याची स्वच्छता, कलरिंग, विद्युत विषयक कामे तसेच समोरील परिसरातील बागेचे काम देखील केले जात आहे. आगामी ८ दिवसात हे काम पूर्ण केले जाणार असून त्यासाठी २५-३० लाख खर्च अपेक्षित आहे. असे भवन रचना विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण शेंडे यांनी सांगितले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: