Pune Mahila Congress | दहशतवादाच्या निषेधार्थ पुण्यात महिला काँग्रेसचा ‘कॅंडल मार्च’

HomeBreaking News

Pune Mahila Congress | दहशतवादाच्या निषेधार्थ पुण्यात महिला काँग्रेसचा ‘कॅंडल मार्च’

Ganesh Kumar Mule Apr 26, 2025 9:02 PM

Amendment in service Rules | PMC Pune | पुणे महापालिका सेवा प्रवेश  नियमावलीत करणार सुधारणा  | 20 डिसेंबर पर्यंत माहिती सादर करण्याचे सर्व विभागांना अतिरिक्त आयुक्तांचे आदेश 
PMC Contract Employees | ४५ वर्षावरील कंत्राटी कामगारांना दिलासा | कामावरून न काढण्याचे पालकमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश
Sarkarwada | शिवसृष्टीचा पहिला टप्पा ‘सरकारवाडा’ चे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते लोकार्पण

Pune Mahila Congress | दहशतवादाच्या निषेधार्थ पुण्यात महिला काँग्रेसचा ‘कॅंडल मार्च’

 

Pune News – (The Karbhari News Service) – पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यात कॅंप भागात प्रदेश महिला काँग्रेसच्यावतीने ‘कॅंडल मार्च’ काढण्यात आला. (Pahalgam Terror Attack)

 

हा कॅंडल मार्च कॅंप भागातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सायंकाळी काढण्यात आला. कॅंडल मार्चचे नेतृत्व प्रदेश महिला काँग्रेस सरचिटणीस स्वाती शिंदे,अनिता मकवाना यांनी केले.या कॅंडल मार्च मध्ये संगीता अशोक पवार,प्रियांका,रणपिसे, ॲड.राजश्री अडसुळ,ज्योती चंदेलवाल,अंजली सोलापुरे,शिवानी माने,ॲड.रेश्मा शिकिलगार,रेखा जैन,व अनेक महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या.

दहशतवादी हल्ल्यात निष्पाप नागरिकांचा बळी गेला. त्यांना महिला काँग्रेसच्यावतीने आम्ही श्रद्धांजली वहात आहोत आणि या संकटाचा प्रतिकार करण्यासाठी सर्व देश एकजुटीने उभा राहील,असे स्वाती शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

माजी गृहराज्यमंत्री रमेशदादा बागवे आपल्या भाषणात म्हणाले की लोकसभेतील विरोधी पक्षनेते आदरणीय राहुलजी गांधी यांनी पहलगामला जावून जखमींची भेट घेतली. तसेच दिल्लीतील सर्व पक्षीय बैठकीत आदरणीय राहुलजी आणि पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेजी यांनी देशाच्या ऐक्याला महत्त्व दिले. त्यांच्या या भूमिकेचे सर्वत्र स्वागत होत आहे