Pune Lok Sabha Constituency | Pune Congress | पुणे लोकसभेसाठी काँग्रेस कडून इच्छुकांची भली मोठी यादी! | 20 लोकांची निवडणूक लढवण्याची इच्छा

HomeBreaking Newsपुणे

Pune Lok Sabha Constituency | Pune Congress | पुणे लोकसभेसाठी काँग्रेस कडून इच्छुकांची भली मोठी यादी! | 20 लोकांची निवडणूक लढवण्याची इच्छा

कारभारी वृत्तसेवा Jan 09, 2024 1:36 PM

PMC JE Recruitment 2024 | Opportunity to become Junior Engineer (JE Civil) in Pune Municipal Corporation
Rahalkar Ram Temple Pune Sadashiv Peth | रहाळकर राममंदिरात काँग्रेसने केली महाआरती, भजन, प्रसादाचे वाटप
PMC EV Charging Station | पुणेकरांना पुणे महापलिकेच्या EV चार्जिंग स्टेशनची शुक्रवार पासून मिळणार सुविधा 

Pune Lok Sabha Constituency | Pune Congress | पुणे लोकसभेसाठी काँग्रेस कडून इच्छुकांची भली मोठी यादी!

| अर्ज करण्यासाठी आज होता शेवटचा दिवस

 

Pune Lok Sabha Constituency | Pune Congress |  पुणे | लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) कांग्रेस ने जोरदार तयारी सुरु केली आहे. पुणे लोकसभेसाठी (Pune Lok Sabha Constituency) इच्छुक उमेदवारांचे अर्ज काँग्रेस कडून (Pune City Congress) मागवण्यात आले होते. त्यासाठी 9 जानेवारी ची  मुदत देण्यात आली होती. या कालावधीत शहर कार्यालयाकडे बऱ्याच इच्छुक लोकांनी आपले अर्ज सादर केले आहेत. यामध्ये जवळपास 20 उमेदवारानी निवडणूक लढवण्याची आपली इच्छा दर्शवली आहे.  यामध्ये बाळासाहेब शिवरकर, मोहन जोशी,  शहर अध्यक्ष अरविंद शिंदे, आबा बागुल, माजी शहर अध्यक्ष अभय छाजेड, प्रदेश सरचिटणीस संजय बालगुडे,  यांच्यासह 20 लोकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यात आरजे संग्राम खोपडे यांचा देखील समावेश आहे. (Pune Lok Sabha Constituency | Pune Congress) 

प्रदेश काँग्रेसने (Maharashtra Congress) लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election 2024) जोरदार तयारी सुरु केली आहे. भाजपला (BJP) या निवडणुकीत मात देण्यासाठी काँग्रेस (Congress) ने कंबर कसली आहे. खासकरून पुणे शहरावर काँग्रेसने (Pune City Congress) चांगलेच लक्ष दिले आहे. दरम्यान पुणे लोकसभा मतदार संघ (Pune Lok Sabha Constituency) समन्वयक पदाची जबाबदारी विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) यांच्याकडे देण्यात आली आहे.
प्रदेश काँग्रेस कडून इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार शहर काँग्रेस ने हे आदेश पारित केले होते. पुणे लोकसभेसाठी महाविकास आघाडी मध्ये   अजून जागा वाटप झाले नसले तरीही परंपरे नुसार ही जागा काँग्रेस च्या वाट्याला येते. त्यानुसार काँग्रेस यावर  पहिल्यापासूनच दावा करत आली आहे. त्यामुळे ही निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेस कडून इच्छुकांची भाऊगर्दी झाली असल्याचे दिसून आले आहे. जवळपास 14 लोकांनी निवडणूक लढवण्याची इच्छा दर्शवली आहे. मात्र प्रदेश कडून कुणा एकालाच उमेदवारी दिली जाणार आहे.

| अविनाश बागवे यांचा अर्ज डायरेक्ट प्रदेश अध्यक्षांकडे?

दरम्यान या 20 लोकांमध्ये माजी शहर अध्यक्ष रमेश बागवे किंवा माजी नगरसेवक अविनाश बागवे यांचा समावेश नाही. सूत्रांच्या माहितीनुसार अविनाश बागवे हे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र त्यांनी काँग्रेस भवन ला अर्ज न भरता आपला अर्ज डायरेक्ट प्रदेश अध्यक्ष यांच्याकडे पाठवला आहे. यावर आता प्रदेश कुणाला उमेदवारी देणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

| हे आहेत इच्छुक

1. अरविंद शिंदे (अध्यक्ष, पुणे शहर काँग्रेस)
2. बाळासाहेब शिवरकर ( माजी मंत्री)
3. रविंद्र  धंगेकर (आमदार)
4. मोहन जोशी
5. अभय छाजेड (सरचिटणीस, म.प्र.काँ.क.)
6. अनंत गाडगीळ (माजी आमदार )
7.  दिप्ती चवधरी ( माजी आमदार )
8.  संजय बालगुडे
9. आबा बागुल ( माजी उपमहापौर )
10. दत्ता बहिरट
11. गोपाळ तिवारी ( प्रवक्ते, म.प्र.काँ.क.)
12. विरेंद्र किराड
13.  यशराज पारखी ( प्रदेश प्रतिनिधी)
14. मुकेश धिवार
15. राजू  नागेंद्र कांबळे
16. मनोज पवार
17.  संगीता तिवारी ( उपाध्यक्ष, म.प्र. म. काँ.क.)
18 नरेंद्र व्यवहारे
19. संग्राम खोपडे (आर. जे.)
20.  दिग्विजय जेधे