Pune Hoarding Renewal | 7 दिवसांत नवीनीकरण प्रस्ताव दाखल करण्याचे अधिकृत होर्डिंग धारकांना आदेश   | उपायुक्त माधव जगताप यांचे आदेश

HomeBreaking Newsपुणे

Pune Hoarding Renewal | 7 दिवसांत नवीनीकरण प्रस्ताव दाखल करण्याचे अधिकृत होर्डिंग धारकांना आदेश | उपायुक्त माधव जगताप यांचे आदेश

कारभारी वृत्तसेवा Nov 04, 2023 5:58 AM

Pune | Traffic Congestion | गणेश मंडळाच्या मांडवाने वाहतूक कोंडी | कारवाई करण्याबाबत अतिक्रमण विभाग उदासीन  | मंडळांना 14 सप्टेंबर ची दिली होती मुदत 
Hawkers : PMC : हस्तांतरण शुल्क न भरणाऱ्या फेरीवाल्यांचा परवाना रद्द होणार!
Hadapsar | Market | हडपसर मधील भाजी मंडई पूर्ववत होणार! | नागरिक आणि गाळेधारकांना दिलासा

Pune Hoarding Renewal | 7 दिवसांत नवीनीकरण प्रस्ताव दाखल करण्याचे अधिकृत होर्डिंग धारकांना आदेश

| उपायुक्त माधव जगताप यांचे आदेश

Pune Hoarding Renewal | शहरातील अधिकृत होर्डिंग धारकांकडून नवीनीकरण करून घेण्यात उदासीनता दिसून येत आहे. चालू आर्थिक वर्षात 1826 पैकी फक्त 245 लोकांनी नवीनीकरण केले आहे. त्यामुळे येत्या 7 दिवसांत सर्वांनी नवीनीकरण करून घेण्याचे प्रस्ताव दाखल करण्याचे आदेश उपायुक्त माधव जगताप (Madhav Jagtap) यांनी दिले आहेत. अन्यथा होर्डिंग, फ्लेक्सवर कारवाई करण्याचा इशारा जगताप यांनी दिला आहे. (PMC Sky Sign Department)

पुणे महानगरपालिकेच्या परवाना व आकाशचिन्ह विभागामार्फत (PMC Pune Sky Sign Department) पुणे शहर हद्दीमध्ये जाहिरात फलक उभारणेस परवानगी दिली जाते. महाराष्ट्र महानगरपालिका आकाशचिन्हे (स्काय साईन ) व जाहिरात प्रदर्शित करण्याचे नियमन आणि नियंत्रण नियम, २०२२ चे तरतुदीनुसार दरवर्षी अधिकृत जाहिरात फलकांचे नूतनीकरण केले जाते. त्यानुसार प्रचलित दरानुसार जाहिरात शुल्क भरून घेण्यात येते. सद्यस्थितीत सन २०२३ २४ मध्ये एकुण १८२६ अधिकृत जाहिरात फलक असून त्यापैकी केवळ २४५ जाहिरात फलक धारकांनी नूतनीकरण करून घेतलेले आहे. उर्वरित १५८१ अधिकृत जाहिरात फलक धारकांनी नूतनीकरण करून घेणे बाकी आहे. (Pune Municipal Corporation)

दरम्यान परवाना व आकाशचिन्ह विभागाचे प्रमुख श्री. माधव जगताप, उप आयुक्त यांनी शुक्रवार रोजी सर्व महापालिका सहायक आयुक्त यांचेसोबत बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये सर्व महापालिका सहायक आयुक्त यांना सर्व अधिकृत जाहिरात फलकधारकांचे नूतनीकरण ७ दिवसांचे आत पुर्ण करणेबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत. तसेच जे अधिकृत जाहिरातदार ७ दिवसांचे आत नूतनीकरणास प्रस्ताव दाखल करणार नाहीत अशा जाहिरात फलकांवर निष्कासनाची कारवाई करण्याचे आदेशीत केलेले आहे. (PMC Pune News)

– ज्यादा दरामुळे उदासीनता

दरम्यान महापालिका प्रशासनाने चालू आर्थिक वर्षात नवीनीकरणासाठी आणि नवीन प्रस्तावासाठी शहरात होर्डिंग, फ्लेक्स, बोर्ड लावायचे (Hoarding) असतील, तर होर्डिंग धारकांना आणखी ज्यादा दर म्हणजे 580 प्रति चौरस फूट दर करण्यात आला आहे. पूर्वी हा दर 111 होता. तर काही लोकांसाठी 222 होता. दरम्यान आता 580 दर झाल्याने होर्डिंग धारकांची उदासीनता दिसून येत आहे. जे होर्डिंग धारक कोर्टात गेले आहेत त्यांना 111 रु दराने मान्यता देण्यात येत आहे. असेच लोक नवीनीकरणासाठी पुढे येत आहेत. बाकी लोकांना 580 दर आहे. हा दर परवडत नसल्याने नवीनीकरणाबाबत उदासीनता दिसून येत आहे.
—-