Pune Helmet Day | PMC Pune | पुणे महापालिकेच्या 250 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर हेल्मेट न घातल्याने कारवाई | उद्याही  कारवाई मात्र ती तीव्र असणार! 

HomeBreaking Newsपुणे

Pune Helmet Day | PMC Pune | पुणे महापालिकेच्या 250 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर हेल्मेट न घातल्याने कारवाई | उद्याही  कारवाई मात्र ती तीव्र असणार! 

Ganesh Kumar Mule May 24, 2023 3:20 PM

Pune Police | PMC Pune | मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने पुणे पोलीस आयुक्तालयात बैठक संपन्न
MLA Ravindra Dhangekar | कसब्यातील 5 प्रभागाच्या विकासासाठी आगामी बजेट मध्ये 10 कोटींची तरतूद करण्याची मागणी | आमदार रविंद्र धंगेकर यांनी कामाला केली सुरुवात
Voting Awareness | जिल्हा प्रशासन, पुणे महानगरपालिका सहित सर्वांनी  मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरीता सामुहिक प्रयत्न करावे |  जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

Pune Helmet Day | PMC Pune | पुणे महापालिकेच्या 250 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर हेल्मेट न घातल्याने कारवाई | उद्याही  कारवाई मात्र ती तीव्र असणार!

Pune Helmet Day | PMC Pune | पुणे शहर आणि जिल्ह्यात आज म्हणजे बुधवारी लाक्षणिक हेल्मेट दिवस (Pune symbolic Helmet day) साजरा करण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख (Collector Dr Rajesh Deshmukh) यांनी आवाहन केले होते. त्यानुसार सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना हेल्मेट घालणे बंधनकारक केले होते. मात्र पुणे महापालिकेच्या (Pune municipal corporation) जवळपास 250 कर्मचारी आणि अधिकाऱ्यानी हेल्मेट परिधान केले नसल्याचे आढळून आले. त्यामुळे महापालिकेच्या गेटवर सकाळीच आरटीओ अधिकाऱ्याकडून (RTO officer) कडून कर्मचाऱ्यावर दंड स्वरूपात कारवाई करण्यात आली. अशी माहिती महापालिकेचे सुरक्षा अधिकारी राकेश विटकर (PMC security Officer Rakesh Vitkar) यांनी दिली. (Pune helmet day | PMC Pune)

पुणे शहर आणि जिल्ह्यातील (Pune city and Pune district) सर्व शासकीय कार्यालयात (Government offices) दुचाकीवर येणारे शासकीय अधिकारी/कर्मचारी (Employees using Two wheeler) हे नियमितपणे हेल्मेटचा (Helmet) वापर करीत असले तरी, हेल्मेट वापराच्या व्यापक जनजागृतीसाठी दिनांक २४.०५.२०२३ रोजी लाक्षणीक हेल्मेट दिवस (Symbolic Helmet Day) साजरा करण्यात आला. पुणे जिल्ह्यातील सर्व शासकीय आस्थापनांतील जे शासकीय अधिकारी / कर्मचारी दुचाकीवरून कार्यालयात येतात. अशा सर्व अधिकारी कर्मचारी यांनी २४.०५.२०२३ रोजी म्हणजे उद्या हेल्मेट परिधान करावे. हेल्मेट घातले नसल्यास कारवाई केली जाईल. असे आदेश जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख (Collector Dr Rajesh Deshmukh) यांनी जारी केले होते. (Pune municipal corporation news)

याबाबत सुरक्षा अधिकारी राकेश विटकर यांनी सांगितले कि, आरटीओ चे कर्मचारी सकाळीच पुणे महापालिकेच्या गेटवर येऊन थांबले होते. ज्या कर्मचाऱ्यांनी हेल्मेट परिधान केले नव्हते त्यांच्यावर तात्काळ दंड स्वरूपात कारवाई करण्यात आली. जवळपास 250 कर्मचारी आणि अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली. प्रत्येकाकडून 500 रु दंड वसूल करण्यात आला. विटकर यांनी सांगितले कि हिकारवाई अजून दोन दिवस चालू राहणार आहे. उद्या हेल्मेट नसेल तर कर्मचाऱ्यांना कामावर घेतले जाणार नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी हेल्मेट परिधान करावे, असे आवाहन विटकर यांनी केले. (PMC Pune news)
—–
News Title | Pune Helmet Day | PMC Pune | Action taken against 250 employees and officials of Pune Municipal Corporation for not wearing helmet Action will be intense tomorrow too!