Pune Grand Challenge Tour | पुणे महानगरपालिका हद्दीतील शाळा २३ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजेनंतर बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी
Pune Grand Tour – (The Karbhari News Service) – पुणे ग्रँड चॅलेंज टूर-२०२६ आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या अनुषंगाने चौथ्या टप्प्याच्याअनुषंगाने पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व सरकारी व खाजगी शाळा २३ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत सुरु ठेवाव्यात; त्यांनतर शाळा बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डूडी यांनी जारी केले आहेत. (PMC Limits School)
स्पर्धेचा चौथा टप्पा हा बालेवाडी ते बालगंधर्व रंगमंदिर या दरम्यान आयोजित करण्यात आला असून त्याचे एकूण ५८ कि.मी अंतर आहे. त्यामुळे पुणे शहरातील होणारी वाहतूक कोंडी तसेच बहुतेक शाळेतील विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्याच्यादृष्टीने आदेश जारी करण्यात आल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

COMMENTS