Pune Gangadham Road Accident | गंगाधाम रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी अवजड वाहनांनवर तत्काळ निर्बंध घाला – प्रमोद नाना भानगिरे
Pramod Nana Bhangire – (The Karbhari News Service) – अवजड वाहनांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी गंगाधाम रस्त्यावरील अवजड वाहनांवर तात्काळ बंदी घालावी. अशी मागणी शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी परिवहन आयुक्तांकडे केली.
बुधवारी दि. १२ जून रोजी दुपारी १२च्या सुमारास गंगाधाम रस्त्यावर अग्निशमन दलाच्या कार्यालयासमोर एका भरधाव डंपरने दुचाकी वरून जात असणाऱ्या दोन महिलांना चिरडले व त्यातील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. व दुसरी महिला गंभीर जखमी झाली. अशा भीषण अपघाताची घटना समोर आली यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर गृहप्रकल्पाची कामे सुरु असल्यामुळे बांधकाम साहित्य घेऊन येणारे ट्रक, डंपर गंगाधाम रस्त्यावरून भरधाव वेगाने जातात. तेथील रस्त्यावरून जाताना तीव्र चढ असल्यामुळे व रस्ता अरुंद असल्यामुळे तिथे अवजड वाहनांवर बंदी घालण्यात आली होती. मात्र, अवजड वाहनांसंदर्भात नव्याने आदेश काढल्यानंतर वाहतूक शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार तेथील रस्त्याच्या वाहतुकीवरील निर्बंध उठविण्यात आले. परिणामी वाहतूक व्यवस्था खोळंबल्यामुळे त्या रस्त्यावर अपघातांच्या मालिका सुरु झाल्या आहेत.
तरी गंगाधाम रस्त्यांवरील अपघात टाळण्यासाठी व वाहतूक सुव्यवस्था राखण्यासाठी अवजड वाहनांवर बंदी घालावी. यासाठी आज प्रादेशिक परिवहन विभागाला पत्र ही देण्यात आले. परिवहन विभागाने तातडीने यावर कार्यवाही नाही केली तर माझ्या नागरिकांसाठी मी थेट रस्त्यावर उतरून आंदोलन करेल. असा थेट इशारा शिवसेना शहर प्रमुख प्रमोद भानगिरे यांनी दिला आहे.