Pune Flood Committee Report | पुण्यातील पूरपरिस्थिती | समितीचा अहवाल महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याची मागणी 

Homeadministrative

Pune Flood Committee Report | पुण्यातील पूरपरिस्थिती | समितीचा अहवाल महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याची मागणी 

Ganesh Kumar Mule Sep 24, 2024 5:46 PM

PMC Power Purchase | Mahapreit | महाप्रीत कडून महापालिका 2.82 kwh दराने वीज खरेदी करणार | SPV केली जाणार स्थापन
PMC will prepare a policy to solve the problems of Punekar citizens!
Vikram Kumar PMC Commissioner gave Another 10 days extension for work order for development work

Pune Flood Committee Report | पुण्यातील पूरपरिस्थिती | समितीचा अहवाल महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याची मागणी

| विवेक वेलणकर यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली मागणी

 

Pune Municipal Corporation – PMC – (The Karbhari News Service) – पुण्यातील पूरपरिस्थिती उद्भवलेल्या भागांची पाहणी करून उपाययोजना सुचवण्यासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याची मागणी सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. (Vivek Velankar Pune)

पुण्यातील सिंहगड रोड सहित पूरपरिस्थिती उद्भवलेल्या सर्व भागांची पाहणी करून उपाययोजना सुचवण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून  २६ जुलै  रोजी एक चार सदस्यीय समिती नेमली होती. यामध्ये अधीक्षक अभियंता साहेबराव दांडगे, दिनकर गोजारी, पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप आणि कार्यकारी अभियंता बिपीन शिंदे यांचा समावेश होता. (Pune PMC News)

याबाबत वेलणकर यांनी दिलेल्या निवेदनानुसार  कालच्या माहिती अधिकार दिनात या समितीचा अहवाल पाहण्यासाठी संबंधित समिती सदस्यांकडे गेलो असता त्यांनी सदरहू अहवाल आपल्या कार्यालयात सप्टेंबर च्या पहिल्या आठवड्यात सादर केल्याचे सांगितले. हा अहवाल पुणे शहराच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने तो महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे आवश्यक होते. मात्र अद्यापपर्यंत हा अहवाल पुणे महापालिका संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेला नाही. त्यामुळे हा अहवाल तातडीने महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावा. तसेच गेल्या तीन आठवड्यात या अहवालावर काय कार्यवाही सुरु केली आहे. याचीही माहिती प्रसिद्ध करावी. अशी मागणी वेलणकर यांनी केली आहे.