IAS Vikra Kumar |Pune Festival | सौ.व श्री विक्रम कुमार यांच्या हस्ते पुणे फेस्टिव्हलच्या श्रींची प्रतिष्ठापना संपन्न
IAS Vikra Kumar | Pune Festival | ३५ व्या पुणे फेस्टिव्हलच्या (35th Pune Festival) श्रींची (Ganesh Utsav) प्रतिष्ठापना सकाळी १०.३० वाजता हॉटेल सारस, नेहरू स्टेडियम, पुणे येथे सौ. स्वाती व श्री. विक्रम कुमार (आयुक्त, पुणे महानगरपालिका) यांच्या शुभहस्ते विधिवत संपन्न झाली. याप्रसंगी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी आणि प्राजक्ता गायकवाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.
पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य समन्वयक अॅड. अभय छाजेड, , माजी महापौर कमल व्यव्हारे , डेक्कन मुस्लिम इंस्टीट्यूटचा अध्यक्षा आबेदा इनामदार ,बाळासाहेब अमराळे , राजू साठे , द.स पोळेकर, अतुल गोंजारी , राजू साठे, अशोक मेंमजादे, रवींद्र दुर्वे , सुप्रिया ताम्हाणे, संयोगिता कुदळे, अनुराधा भारती ,निकिता मोघे , विद्या खळदकर, विनोद सुर्वे,नामदेव चाळके, सचिन साळुंखे , सचिन खवले , विजय शेटे , सागर बाबर ,अहमद शेख , सुभाष सुर्वे व कार्यकर्ते मोठ्ये संख्येने उपस्थित होते. वेदमूर्ती पं. धनंजय घाटे गुरूजी यांनी पौराहित्य केले. यासाठी हॉटेल सारस नेहरू स्टेडीयम येथे आकर्षक सजावट करण्यात आली आहे.