Pune Corporation Property tax | प्रॉपर्टी टॅक्स वसुलीवर जोर देण्याचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी यांचे आदेश   | सर्व्हेसाठी लवकरच कर्मचारी उपलब्ध करून दिले जाणार

HomeBreaking Newsपुणे

Pune Corporation Property tax | प्रॉपर्टी टॅक्स वसुलीवर जोर देण्याचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी यांचे आदेश | सर्व्हेसाठी लवकरच कर्मचारी उपलब्ध करून दिले जाणार

गणेश मुळे Jun 08, 2024 11:05 AM

Pune Property tax PT 3 Application | PT 3 अर्ज सर्व्हे : प्रस्तावाचा फेरविचार करून 4 लाख पुणेकरांना दिलासा द्या | माजी नगरसेवकांची मागणी
  15 days extension for citizens to pay property tax at discount!  |   Decision of PMC Property Tax Department
Pune Property Tax | मिळकतकरामधून पुणे महापालिकेला 1330 कोटींचे उत्पन्न | 68% लोकांनी ऑनलाईन पद्धतीचा केला उपयोग

Pune Corporation Property tax | प्रॉपर्टी टॅक्स वसुलीवर जोर देण्याचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी यांचे आदेश

| सर्व्हेसाठी लवकरच कर्मचारी उपलब्ध करून दिले जाणार

PMC Property tax Department- (The Karbhari News Service) – प्रॉपर्टी टॅक्स वसुली बाबत महापालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी (Prithviraj B P IAS) यांनी नुकतीच एक आढावा बैठक घेतली. यामध्ये अतिरिक्त आयुक्तांनी वसुलीवर जोर देण्याचे निर्देश मिळकतकर विभागाला दिले आहेत. तसेच PT 3 अर्ज भरून देण्यासाठी लवकरच विभागाला कर्मचारी उपलब्ध करून दिले जातील. असे आश्वासन अतिरिक्त आयुक्तांनी दिले आहे. (Pune Municipal Corporation Property Tax Department)

महिना अखेर पर्यंत 1500 कोटी पर्यंत उत्पन्न जमा करा

नागरिकांना 5-10% सवलत देण्यासाठी 15 जून पर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे. तो कालावधी लवकरच संपेल. त्यानंतर वसुलीवर भर द्या, असे अतिरिक्त आयुक्तांनी सांगितले. ज्या लोकांनी मागील वर्षी या कालावधीत मिळकतकर भरला होता मात्र यंदा अजून भरला नाही, त्यांना सम्पर्क करा. त्यांच्याकडून मिळकतकर भरून घ्या. अनधिकृत मिळकती सापडल्या असतील तर त्यांना टॅक्स लावून घ्या. आता 1200 कोटी पर्यंत उत्पन्न जमा झाले आहे. जून अखेर पर्यंत हे उत्पन्न 1500 कोटी पर्यंत जायला हवे, असे आदेश अतिरिक्त आयुक्तांनी दिले आहेत.

शहरातील 4 लाख मिळकतींचा केला जाणार सर्वे!

पुणे शहरातील स्व-वापराच्या निवासी मिळकतींना मिळकत करात 40% सवलतीच्या अनुषंगाने पुणे महापालिकेकडून (Pune Municipal Corporation (PMC) प्रायोगिक तत्वावर तपासणी मोहीम सुरु करण्यात आली होती. त्याचा आधार घेऊन आता संपूर्ण शहरात ही मोहीम राबवली जाणार आहे. सुमारे 4 लाख मिळकतींचा सर्वे केला जाणार आहे. त्यासाठी अतिरिक्त 500 कर्मचारी घेतले जाणार आहेत. लोकांकडून PT 3 अर्ज भरून घेण्यात येणार आहे. त्यासाठी लवकरच हे कर्मचारी खात्याला उपलब्ध करून दिले जातील. असे अतिरिक्त आयुक्तांनी सांगितले.