Pune Breaking News | पुणे महानगरपालिका आणि पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या अमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहिमेचा शुभारंभ

Homeadministrative

Pune Breaking News | पुणे महानगरपालिका आणि पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या अमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहिमेचा शुभारंभ

Ganesh Kumar Mule Apr 07, 2026 8:42 PM

Ganesh Bidkar : Election : महाविकास आघाडीतील पक्ष विचाराने कधी एकत्र येऊ शकत नाहीत  : सभागृह नेते गणेश बिडकर
40% tax rebate | ४०% कर सवलत | अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार | महापालिकेने सद्यस्थितीत वाढीव रक्कम घेऊ नये | बैठकीत सूचना
River Devlopment : Ganesh Bidkar : नदी सुशोभिकरण नव्हे, नदी सुधारणाच! : सभागृह नेते गणेश बिडकर यांचा दावा 

Pune Breaking News | पुणे महानगरपालिका आणि पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या अमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहिमेचा शुभारंभ

 

Pune Drugs News – (The Karbhari News Service) – नागरिक लोकप्रतिनिधींना केवळ रस्ते, ड्रेनेजसारखी कामे करण्यासाठी निवडून देत नाहीत. समाजात घडणाऱ्या चुकीच्या गोष्टींना आळा घालणे ही देखील लोकप्रतिनिधी म्हणून आमची जबाबदारी आहे. अमली पदार्थांमुळे तरुणाईत वाढणारी व्यसनाधीनता रोखण्यासाठी समाजात व्यापक जनचळवळ उभारण्याचे काम येत्या काळामध्ये करत, पोलीस आणि नागरिक यांच्यातील सेतू म्हणून आम्ही कार्य करू, अशी ग्वाही सभागृह नेते गणेश बिडकर (Ganesh Bidkar PMC) यांनी दिली आहे. (Pune Police)

पुणे महानगरपालिका आणि पुणे शहर पोलीस आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात राबवण्यात येणाऱ्या अमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहिमेची सुरुवात प्रभाग क्रमांक २४ मधून करण्यात आली, यावेळी बिडकर बोलत होते. यावेळी नगरसेवक देवेंद्र वडके, कल्पना बहिरट, उज्वला यादव, निलेश आल्हाट, परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने, फरासखानाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुणे शहरामध्ये ड्रग्स तस्करी आणि सेवनाचे प्रकार वाढण्याच्या घटना पुढे आल्या आहेत. पोलिसांकडून अशा गैरप्रकारांना आळा घालण्याचे काम केले जाते. लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून देखील सहकार्य मिळाल्यास अमली पदार्थाच्या तस्करीला रोखण्यात मदत होऊ शकते. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका व पोलीस आयुक्तालयाच्या माध्यमातून विशेष जनजागृती मोहीम शहरांमध्ये हाती घेण्यात आली आहे.

यावेळी गणेश बिडकर म्हणाले, “अमली पदार्थांच्या विळख्यात अडकून अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. वाढत्या ड्रग्सच्या वापराला आळा घालणे ही केवळ पोलिसांची जबाबदारी नसून समाजातील प्रत्येक घटकाची आहे. ज्या ठिकाणी अमली पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती मिळेल, तेथे कारवाईसाठी पोलिसांना आम्ही पूर्ण सहकार्य करू, कमी किमतीत अमली पदार्थ उपलब्ध होत असल्याने तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर या व्यसनाच्या गर्तेत ओढली जात आहे. या उपक्रमामुळे शहरात व्यसनमुक्तीसाठी जनजागृती वाढण्यास मदत होईल.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: