Pune BJP New Office |  शहर भाजपचे नवीन कार्यालय सुरू | देवेंद्र फडणवीस यांच्यासहित विविध नेत्यांकडून शुभेच्छा 

HomeपुणेBreaking News

Pune BJP New Office |  शहर भाजपचे नवीन कार्यालय सुरू | देवेंद्र फडणवीस यांच्यासहित विविध नेत्यांकडून शुभेच्छा 

कारभारी वृत्तसेवा Jan 07, 2024 2:41 PM

Katraj Dairy Pune | Play Ground Reservation | कात्रज येथील मैदानाचे आरक्षण उठवू नये या मागणीसाठी महाविकास आघाडीचे वतीने पुणे महानगरपालिकेसमोर आंदोलन
Pune Lok Sabha Constituency | Pune Congress | काँग्रेस कडून पुणे लोकसभा समन्वयक पदाची जबाबदारी विश्वजित कदम यांच्याकडे!
Phule Smarak Pune | महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यातील स्मारकांच्या विकास आराखड्यांचा  आढावा

Pune BJP New Office |  शहर भाजपचे नवीन कार्यालय सुरू | देवेंद्र फडणवीस यांच्यासहित विविध नेत्यांकडून शुभेच्छा

 

Pune BJP New Office | विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आज शहर भाजपच्या एरंडवण्यातील डीपी रस्त्यावरील (DP Road Pune) नूतन कार्यालयाला भेट देऊन शुभेच्छांचा वर्षाव केला. अत्यंत उत्साही वातावरणात जय श्रीरामच्या जयघोषात नूतन कार्यालय कार्यान्वित झाले. शहर भाजपचे पुणे महानगरपालिका (PMC Pune)  परिसरातील मध्यवर्ती कार्यालय नवीन वास्तुत स्थलांतरित करण्याच्या निमित्ताने स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. (Pune BJP New Office)

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athvale), प्रदेश भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) , उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील (Chandrakant Patil), ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (girish Mahajan) यांनी कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक राजकीय सहकार क्षेत्रातील मान्यवरांनी भेट दिली. भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे (Dheeraj Ghate BJP Pune) यांनी स्वागत केले.

सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि पुणे शहराचा गतिमान पारदर्शक विकास करण्यासाठी या कार्यालयाच्या माध्यमातून अविरत प्रयत्न केले जातील असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यालयाला भेट देऊन शुभेच्छा दिल्या. कार्यकर्त्यांच्या माध्यमातून घरोघरी संपर्क साधण्याबरोबर माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून नागरिकांपर्यंत पोहोचून संघटनात्मक कार्य बळकट करण्यावर भर दिला जाईल.

आगामी काळातील निवडणुकांचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी आणि भारतीय जनता पार्टीचा विचार प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचविण्यासाठी या कार्यालयाच्या माध्यमातून कार्यकर्ते नियोजन करतील असे मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले.

लोकसभा विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुकांमध्ये पुणेकरांनी भारतीय जनता पार्टीवर विश्वास व्यक्त केला होता. हा विश्वास शहर भाजपने सार्थ ठरविला असून, आगामी काळात तो दृढ करण्यासाठी सर्व कार्यकर्ते एकजुटीने प्रयत्न करतील असे मत शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी व्यक्त केले.

जनसंघापासून भाजपच्या आजवरच्या ज्येष्ठ आणि नव्या कार्यकर्त्यांनी आठवणींना उजाळा देत गप्पा रंगवल्या.

प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, लोकसभा मतदार संघ संयोजक श्रीनाथ भिमाले यांची प्रमुख उपस्थिती होती.या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस च्या खासदार वंदना चव्हाण , श्रीकांत शिरोळे, प्रदीप गारटकर, मनसेचे अजय शिंदे यांच्या सह सर्व पक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते