Pune Airport New Terminal | नवीन टर्मिनल सुरू व्हावे म्हणून शिवसेनेने प्रतीकात्मक कागदी विमान उडवून केले आंदोलन

HomeBreaking Newsपुणे

Pune Airport New Terminal | नवीन टर्मिनल सुरू व्हावे म्हणून शिवसेनेने प्रतीकात्मक कागदी विमान उडवून केले आंदोलन

गणेश मुळे Feb 29, 2024 1:53 PM

MLA Sunil Tingre | प्रवाशांच्या सोईसाठी मेट्रो विमानतळापर्यंत जोडावी | आमदार सुनिल टिंगरेंची विधानसभेत मागणी
Jyotiraditya Shinde | देशांतर्गतसह आंतरराष्ट्रीय कार्गोची सोय पुणे विमानतळावर कार्यान्वित करणार | केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची घोषणा
Pune Airport New Terminal | पुणे विमानतळ टर्मिनल खुले होणार | काँग्रेसच्या लढ्याला यश

Pune Airport New Terminal | नवीन टर्मिनल सुरू व्हावे म्हणून शिवसेनेने प्रतीकात्मक कागदी विमान उडवून केले आंदोलन

 

Pune Airport New Terminal | पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनलचे त्वरीत उदघाटन करून सुरू करणेसंदर्भात  संतोष ढोके संचालक, एअर पोर्ट अथाॅरिटी आॅफ इंडिया, याना भेटून शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पुणे शहराच्या वतीने निवेदनात्मक पत्र देऊन घेराव घालण्यात आला. (Shivsena UBT)

याबाबत शहर प्रमुख संजय मोरे यांनी सांगितले कि, नवीन टर्मिनल चे उद्घाटन लांबल्या प्रकरणी शिवसेनेने प्रतीकात्मक कागदी विमान उडवून आंदोलन केल्यानंतर संचालक संतोष डोके यांना घेराव घालून विचारणा केली असता त्यांनी सांगितले काही तांत्रिक बाबींची जोडणीचे काम सुरू आहे. येथे आठ दिवसात पूर्ण होईल म्हणून संचालक संतोष ढोके आणि आम्ही एकत्रितरित्या टर्मिनल ची पाहणी केली असता असे दिसून आले की उर्वरित तांत्रिक जोडणीचे काम हे फक्त दीड दिवसात पूर्ण होण्यासारखे आहे. खरे तर हे काम मुद्दाम करायचे बाकी ठेवलेले दिसून येत आहे जेणेकरून कोणी विचारणा केली तर सांगता येईल तांत्रिक बाबीचं काम होणे बाकी आहे.

पुणे लोहगाव येथील विमानतळावरील प्रवाशांचा सतत वाढता ओघ पाहून ५२ हजार चौ. फूट जागेवर नवीन टर्मिनल तयार करण्यात आले. सदर टर्मिनलसाठी आमच्या माहितीप्रमाणे 480 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. अटीशर्ती प्रमाणे नवीन टर्मिनल ऑक्टोबर 2023 पर्यंत बांधकाम पूर्ण करून सुरू करणे अपेक्षित होते. टर्मिनलचे काम पूर्ण झाल्यानंतर मागील तीन महिन्यापासून या टर्मिनलच्या उदघाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ मिळत नसल्यामुळे उदघाटन रखडले आहे. फेब्रुवारी 19 किंवा 20 रोजी पंतप्रधानांच्या हस्ते विमानतळ टर्मिनलचे उदघाटन होणार म्हणून पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी तयारीसाठी तत्परतेने संबंधित अधिकाऱ्यांची बैठकही घेतली. पंतप्रधानांना हि वेळ सोयीची (कदाचित योग्य मुहुर्त) नसल्याने उदघाटन होउ शकले नाही. असे देखील मोरे यांनी सांगितले.

विमानतळावरील नवीन टर्मिनलमधे चेक इन काउंटर, लिफ्ट, एस्कलेटर, पादचारी पूल यासर्व सुविधांची संख्या वाढविली असल्याने, नवीन टर्मिनलची वार्षिक प्रवासी क्षमता सव्वा कोटी इतकी होणार आहे. जुने टर्मिनल अपुरे पडत असल्या कारणाने गर्दी होउन प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. पंतप्रधानांना उदघाटनासाठी वेळ नसेल तर प्रशासनाने निर्णय घेउन सव्वा कोटी प्रवाशांपैकी एका सदगृहस्थाच्या हस्ते उदघाटन करावे. आणि प्रवाशांची होणारी ससेहोलपट थांबवावी. सर्वसामान्य माणसाच्या कररूपी पैशातून नवीन टर्मिनल उभारले आहे. मग पुणेकर व इतर प्रवाशांना नवीन टर्मिनलच्या सुविधांपासून दूर का ठेवले जात आहे ? एका नेत्यासाठी नवीन टर्मिनल वापर करण्यासाठी सज्ज असताना विनाकारण बंद ठेवणे योग्य आहे का ? याबाबत खुलासा करण्यात यावा.

नवीन टर्मिनल लगेच सुरू न केल्याने प्रवाशांची होणारी गैरसोय थांबविण्यासाठी उदघाटन न करता नवीन टर्मिनल त्वरीत सुरू करण्यात यावे अशी आग्रहाची मागणी आपणास शिवसेना पुणे शहराचे वतीने करण्यात आली.

पुणे शहरप्रमुख संजय मोरे, संघटक राजेंद्र शिंदे, उपशहरप्रमुख प्रशांत राणे, विधानसभाप्रमुख आनंद गोयल, संजय वाल्हेकर, जानू आखाडे, किशोर पाटील, शांताराम उर्आबा खलसे, शशिकांत साटोटे, रूपेश पवार, बाळासाहेब गरूड, शशी देवकर, विक्की धोत्रे, दिलिप महादे, उत्तम भुजबळ, दत्ता खवळे, तारिख शेख, प्रमोद पारधे, मकरंद पेठकर, नंदु येवले, दिलीप मोराळे, प्रसाद जठार, अक्षय माळकर, राहुल शेडगे, शुभम वंजारे, सलमान शेख, सोनू पाटील, अंकित अहिरे, उमेश दगडे, विदया होडे, अमिर शेख, श्नीकांत खांदवे, नागेश खडके., आर्दश हाचत्तोडे, मुकुंद जाधव, अनिल जाधव, पवन राठोड, आकाश आडपे, संतोष भूतकर, बकुल डाखवे, नानु कांबळे, गजानन गोंडचवर, देवा तमायची, सोमनाथ गायकवाड, प्रशांत चांधरे उपस्थित होते.