Pune Airport New Terminal | मोहोळजी, प्रसिद्धी नको विमान प्रवाशांना सुविधा द्या | माजी आमदार मोहन जोशी

Mohan Joshi, Congress Leader.

HomeBreaking News

Pune Airport New Terminal | मोहोळजी, प्रसिद्धी नको विमान प्रवाशांना सुविधा द्या | माजी आमदार मोहन जोशी

Ganesh Kumar Mule Aug 11, 2024 3:50 PM

Pune Airport New Terminal News | विमानतळाच्या नवीन टर्मिनलद्वारे प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्या | उपमुख्यमंत्री अजित पवार
Pune Airport New Terminal Inauguration | लोहगाव टर्मिनल 2 चे 19 फेब्रुवारीला नरेंद्र मोदींच्या हस्ते उदघाटन होण्याची शक्यता 
Pune Airport’s new integrated terminal building inaugurated by Prime Minister Narendra Modi online

Pune Airport New Terminal | मोहोळजी, प्रसिद्धी नको विमान प्रवाशांना सुविधा द्या | माजी आमदार मोहन जोशी

 

Mohan Joshi Vs Muralidhar Mohol – (The Karbhari News Service) – केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) आणि भाजपचे नेते लोहगाव विमानतळ टर्मिनल (Lohgaon Airport Terminal) च्या निमित्ताने प्रसिद्धीचा सोस भागवून घेत आहेत. मात्र, अपुऱ्या सुविधा असलेल्या टर्मिनलचे उदघाटन केल्यामुळे प्रवाशांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे. अशी टीका माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी (Mohan Joshi Pune congress) यांनी केली आहे. (Pune News)

 

लोहगाव विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन, प्रवाशांना सुविधा द्याव्या, अशी मागणी मोहन जोशी यांनी केली. विमानतळावरील गर्दी टाळणे आणि प्रवाशांना प्रवासासाठी सुलभ व्यवस्था करून देणे यात अनेक त्रुटी राहिल्या आहेत. विमानतळ टर्मिनल एक वर्षांपूर्वी तयार झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोयीची तारीख मिळावी याकरिता उदघाटन लांबवत नेले. लोकसभा निवडणुकीच्या आधी सहा महिन्यांपूर्वी टर्मिनलचे उदघाटन झाले. मात्र, ते प्रवाशांसाठी खुले करण्यात आले नव्हते. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना नागरी विमान वाहतूक खात्याचे राज्यमंत्री पद देण्यात आले. त्यानंतर मोहोळ यांनी टर्मिनल ची पहाणी करून मोठा गाजावाजा केला. टर्मिनल एक महिन्यापूर्वी कार्यान्वित केले. पण, वर्षभराचा अवधी मिळूनही प्रवाशांसाठी सुविधाच उपलब्ध करून दिल्या नाहीत, असे मोहन जोशी यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

 

विमानतळ टर्मिनलवर ॲपद्वारे नोंदणी केल्यावरही रांग न लावता प्रवेश करण्यासाठी डिजीयात्रा काउंटरची सुविधा अद्याप उपलब्ध नाही. लोहगाव विमानतळावर नवीन टर्मिनलवर होणाऱ्या विमान वाहतूकीसाठी दिशादर्शक फलक ठळकपणे लावलेले नाहीत. इमिग्रेशन आणि कस्टम काउंटरची व्यवस्था अजून उपलब्धच नाही. लाउंजची व्यवस्था अजून नाही. अन्य आऊटलेटचे काम झालेले नाही. भाजपच्या नेत्यांनी फक्त प्रसिद्धी मिळवून घेतली. हे टर्मिनल आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्यात अपयश आले आहे, अशी टीका मोहन जोशी यांनी केली आहे. मंत्री महोदयांनी प्रसिद्धीचा सोस न करता प्रवाशांना सुविधा मिळतील याकडे लक्ष द्यायला हवे, अशी मागणी मोहन जोशी यांनी केली आहे.

 

पुणे मेट्रोबाबतही हेच घडले. आठ वर्षापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी मेट्रोचे उदघाटन केले. तरीही टप्पा एक चे काम पूर्ण झालेले नाही. मात्र, तीन किलोमीटरवर मेट्रो स्टेशन झाले, तेव्हा त्याच्या उदघाटनाचा इव्हेंट केला. याच पद्धतीने विमानतळ टर्मिनलवर इव्हेंट करण्यासाठी सुविधा रखडून ठेवल्या आहेत का? अशी शंका वाटते, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0