Pune Air Pollution | नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 6 बिल्डरांना महापालिकेकडून नोटीस

HomeपुणेBreaking News

Pune Air Pollution | नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 6 बिल्डरांना महापालिकेकडून नोटीस

कारभारी वृत्तसेवा Nov 22, 2023 4:02 PM

Pune Hoarding Renewal | 7 दिवसांत नवीनीकरण प्रस्ताव दाखल करण्याचे अधिकृत होर्डिंग धारकांना आदेश | उपायुक्त माधव जगताप यांचे आदेश
Hawkers : PMC : हस्तांतरण शुल्क न भरणाऱ्या फेरीवाल्यांचा परवाना रद्द होणार!
Ganesh Mandal | गणेश मंडळाचे मांडव काढून घेण्यासाठी उद्या पर्यंतची मुदत |नाही काढल्यास पुढील वर्षी परवानगी नाही | महापालिका उपायुक्त माधव जगताप यांचे आदेश

Pune Air Pollution | नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 6 बिल्डरांना महापालिकेकडून नोटीस

 Pune Air Pollution | आदेश देऊनही नियमांचं उल्लंघन करणार्‍या ६ बांधकाम व्यावसायिकांना (Builders) महापालिका प्रशासनाकडून Pune Municipal Corporation (PMC) नोटीस देण्यात आली आहे. दरम्यान यापुढे राडा रोडा वाहतुक करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. अशी माहिती उपायुक्त माधव जगताप (Madhav Jagtap) यांनी दिली.  (Pune Air Pollution)

सर्वोच्च न्यायालयाने शहरातील वायु प्रदुषणाविषयी चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर खळबळून जागे झालेल्या राज्य सरकार आणि महापालिकांनी नियमावली जाहीर केली. शहरात सूक्ष्म धुलिकणांवर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेने उपाययोजना जाहीर केल्या. यात बांधकामे तसेच प्रकल्पांच्या ठिकाणी धूळ उडणार नाही, यासाठी नियमावली लागू केली. मात्र, या नियमावलीचे पालन संबंधित बांधकाम व्यावसायिकांकडून होत नसल्याचे आढळून आले आहे.

यामुळे आता प्रशासनाकडून कठोर भुमिका घेण्यास सुरुवात केली आहे. सहा बांधकाम व्यावसायिकांना नोटीस दिली आहे. बांधकामाच्या ठिकाणी बाजुने पत्रे न उभारणे, धुळीचा प्रवास रोखण्यासाठी हिरवे कापड न लावणे आदी उपाय योजना न केल्यामुळे या नोटीस दिल्या गेल्या आहेत. तसेच बांधकामाच्या ठिकाणाहून राडारोडा, खोदकाम केल्यानंतरचा मुरुम, माती आदीची वाहतुक करणार्‍यांनी तो झाकून नेला नाही तर त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे. बांधकाम व्यावसायिकांना नोटीस पाठविल्यानंतर त्यांनी उपाययोजना केली नाही तर कठोर कारवाई त्यांच्यावर केली जाणार असल्याची माहिती जगताप यांनी दिली. (Pune Air Pollution)