Pune 5 Star City | PMC | पुणे शहर झाले आता 5 स्टार! | पुणे महापालिकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा!

HomeBreaking Newsपुणे

Pune 5 Star City | PMC | पुणे शहर झाले आता 5 स्टार! | पुणे महापालिकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा!

कारभारी वृत्तसेवा Jan 05, 2024 5:08 PM

PEHEL 2024 Pune PMC | पेहेल-२०२४ |  4 तासात 53 टन ई-कचरा आणि प्लॅस्टिक जमा
PEHEL 2024 Pune PMC | 53 tonnes of e-waste and plastic Waste accumulated in 4 hours
Pune 10th Ranking | Pune 5 Star City | स्वच्छ सर्वेक्षण च्या ऑल इंडिया रँकिंग मध्ये पुणे 20 वरून 10 व्या स्थानावर

Pune 5 Star City | PMC | पुणे शहर झाले आता 5 स्टार! | पुणे महापालिकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा!

| पुणे महापालिकेला मिळाला राष्ट्रीय पुरस्कार

Pune 5 Star City | PMC | पुणे शहराच्या (Pune City) शिरपेचात आणखी एका मानाचा तुरा खोवला गेला आहे. पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) करत असलेल्या प्रयत्नामुळे पुणे शहर आता 5 स्टार झाले आहे. पुणे महापालिकेला (PMC Pune) स्वच्छ सर्वेक्षण 2023 (Swachh Survey 2023) मध्ये एक राष्ट्रीय पुरस्कार आणि स्टार सिटी प्रमाणपत्र मिळाले आहे. पुणे शहर हे आजपर्यंत 3 स्टार मधेच होते. मात्र महापालिकेने उत्तम कामगिरी करून पहिल्यांदाच 5 स्टार होण्याचा मान मिळवला आहे. पुणे महापालिका आणि पुणे शहरासाठी ही मोठी उपलब्धी मानली जात आहे. (PMC Pune News)
देशातील राहण्यायोग्य सर्वोत्तम शहर म्हणून पुणे शहराचा नावलौकिक झाला आहे. तसेच विद्येचे माहेरघर, राज्याची सांस्कृतिक राजधानी अशी बरीच बिरुदे पुणे शहराला मिळाली आहेत. त्यात अजून एक नावलौकिकाची भर पडली आहे. पुणे शहर आता 5 स्टार झाले आहे. पुणे महापालिकेचा घनकचरा विभाग (PMC Solid Waste Management Department) यासाठी सातत्याने प्रयत्नशील होता. पुणे शहर आतापर्यंत 3 स्टार मधेच होते. मात्र आता यात वाढ होऊन ते 5 स्टार झाले आहे. खरे पाहता महापालिका यासाठी 2019 सालापासूनच प्रयत्न करत होती. मात्र काहींना काही कारणाने हे मानांकन हातून सुटत होते. मात्र अखेर महापालिकेने ही उपलब्धी मिळवली आहे. याबाबत सप्टेंबर च्या शेवटच्या आठवड्यात केंद्राकडून सर्वे करण्यात आला होता. यामध्ये घरोघर कचरा जमा करणे, कचऱ्याचे वर्गीकरण करणे, अशा 24 विविध घटकांचा समावेश होता. या सर्व गोष्टीत महापालिकेने चांगली प्रगती केली आहे. त्यामुळे महापालिका हा ‘किताब मिळवू शकली आहे. पुणे महापालिका आगामी काळात 7 स्टार आणि वॉटर प्लस मानांकन मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. जायका प्रकल्प अंतर्गत जलशुद्धीकरण केंद्राची कामे पूर्ण झाल्यावर महापालिका यासाठी पात्र होऊ शकते. (Pune PMC News)
दरम्यान नुकतेच केंद्र सरकारकडून पुणे शहराला हे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. तसेच 11 जानेवारीला राष्ट्रीय पुरस्कार दिला जाणार आहे. यामध्ये शहराची स्वच्छ सर्वेक्षण मधील रँकिंग देखील कळणार आहे. केंद्र सरकारने 11 जानेवारीला राज्यातून फक्त 3 शहरांनाच निमंत्रण दिले आहे. यामध्ये नवी मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराचा समावेश आहे. पुणे महापालिकेचे याबाबत कौतुक होत आहे. पुणे महापालिका याआधीच ओपन डिफिकेशन मुक्त झाले आहे. याबाबत महापालिकेने मानांकन देखील मिळवले आहे. मात्र महापालिका अजून कामगिरीत सुधारणा करत असून रँकिंग पहिल्या 5 मध्ये ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहे. तसेच आगामी काळात 7 स्टार आणि वॉटर प्लस मानांकन मिळवण्याचा मानस देखील महापालिकेच्या घनकचरा विभागाने व्यक्त केला आहे.
पुणे शहराला पहिल्यांदाच 5 स्टार प्रमाणपत्र मिळाले आहे. आगामी काळात आपण 7 स्टार साठी प्रयत्न करणार आहोत. 5 स्टार मध्ये देशातील 8-9 शहरे आहेत. त्यामध्ये पुण्याचा समावेश आहे. ही पुणे महापालिकेच्या दृष्टीने मोठी गोष्ट आहे. महापालिकेने केलेल्या चांगल्या कामगिरीवर केंद्र सरकारने मोहोर लावली आहे. मागील वर्षी पेक्षा खूप सुधारणा आपण केल्या आहेत. महापालिका आपल्या कामगिरीत अजून चांगल्या सुधारणा करणार आहे. दरम्यान 11 जानेवारीला दिल्लीला होणाऱ्या कार्यक्रमात पुणे शहराला देखील निमंत्रण आहे. ही आणखी चांगली गोष्ट आहे. यात राष्ट्रीय पुरस्कार आणि आपली रँकिंग देखील  कळणार आहे.
डॉ कुणाल खेमणार, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका 
स्वच्छ सर्वेक्षण 2023, (SS23), आपल्या पुणे महापालिकेला एक राष्ट्रीय पुरस्कार आणि 5 स्टार सिटी प्रमाणपत्र मिळाले आहे. मनपा आयुक्त यांचे प्रशंसनीय नेतृत्व व विश्वास, अतिरिक्त आयुक्त यांचे  मार्गदर्शन, तसेच सर्व  अधिकारी आणि कर्मचारी यांचे कठोर परिश्रम यामुळे हे घडले आहे. आजी माजी पदाधिकारी, पत्रकार आणि पुणेकर नागरिक यांचे देखील यात मोलाचे योगदान आहे. मात्र आता आमची जबाबदारी वाढली आहे. आम्ही जोमाने काम करू.
संदिप कदम, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग