२०१९ च्या लोकसभा निवडणुकिसाठी पूर्वनियोजित असलेला पुलवामा हल्ला | नाना पटोले
केंद्रातील मोदी सरकारने पुलवामा हल्ल्याच्या प्रसंगी दाखविलेली निष्काळजीपणाच्या निषेधार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वाखाली ” शर्म करो मोदी शर्म करो” हे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे करण्यात आले.
यावेळी बोलताना नानाभाऊ पटोले म्हणाले की काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा येथील जवानांवर झालेल्या हल्ल्यासंदर्भात जे सत्य देशातील नागरिकांसमोर मांडले यावरून सिद्ध होते की केंद्रातील मोदी सरकार हे शहीदांच्या नावाने राजकारण करून सत्ता मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात ह्या हल्ल्यामध्ये ४० जवान शहीद झाले परंतु मोदी सरकारने ३०० किलो RDX कोठून आणले. त्याच पद्धतीने जवानांना विमानाची सुरक्षितता का देण्यात आली नाही याबाबत चौकशी सुध्दा केंद्रीय सरकारने केली नाही कोणत्याही प्रकारचा गुन्हाही दाखल केला नाही. यावरून सिद्ध होते की पुलवामा हल्ला हा पूर्वनियोजित होता व त्याचा २०१९च्या लोकसभा निवडणुकिसाठी वापर करण्यात आला. गौतम अदानी यांच्या शेल कंपन्यांमध्ये २०हजार कोटी कुणी गुंतवले आणि हा काळा पैसा कोणाचा आहे याचे उत्तर देखील देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांनी द्यायला पाहिजे कारण भ्रष्टाचाराच्या विरोधात JPC ची मागणी कॉंग्रेससहीत देशातील सर्व विरोधी पक्षांनी लावून धरली आहे पुलवामा हल्ल्याच्या संदर्भात राज्यभर ” शर्म करो मोदी शर्म करो” आंदोलने घेण्यात आली असून याबाबत चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे.
या आंदोलनाचे आयोजन पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केले. यावेळी माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, रमेश बागवे, ऍड अभय छाजेड, संजय बालगुडे,आबा बागुल,चंदूशेठ कदम,कमल व्यवहारे, गोपाळ तिवारी, मेहबूब नदाफ, लता राजगुरू, अविनाश बागवे, रफिक शेख ,अजित दरेकर, सुजाता शेट्टी, संगिता तिवारी, रजनी त्रिभुवन, सुजित यादव, सुनिल धाडगे, राजेंद्र भुतडा, सचिन आडेकर, रमेश सोनकांबळे, प्रदीप परदेशी विजय खळदकर, सतिश पवार, अजित जाधव, रमेश सकट,रवी ननावरे, सोमेश्वर बालगुडे, राजेंद्र शिरसाट, बाळासाहेब अमराळे, सुनिल शिंदे,शिलार रतनगिरी,द स् पोळेकर, प्रशांत सुरसे, शिवराज भोकरे, प्रकाश पवार, सुधीर काळे,चेतन आगरवाल, सुरेश कांबळे,मामा परदेशी, दिपक ओव्हाळ, सुरेश चौधरी, श्रीरंग चव्हाण, वैष्णवी किराड, ज्योती परदेशी,छाया जाधव, सुंदर ओव्हाळ, इंद्रजित भालेराव, कृष्णा सोनकांबळे,लतेंद्र भिंगारे इत्यादी उपस्थित होते