PT 3 Form | Pune Property Tax | PT-3 अर्ज भरून देण्याची मुदत 30 नोव्हेंबर पर्यंत | पुणेकरांना दिलासा

HomeपुणेBreaking News

PT 3 Form | Pune Property Tax | PT-3 अर्ज भरून देण्याची मुदत 30 नोव्हेंबर पर्यंत | पुणेकरांना दिलासा

कारभारी वृत्तसेवा Nov 13, 2023 3:13 PM

PMC Property Tax Department is planning to auction 200 sealed commercial properties
Property Tax | मिळकतकर विभागाने घडविला इतिहास | विविध अडचणींवर मात करत वर्षभरात 1965 कोटींचे उत्पन्न
PMC Property Tax Lottery | मुदतीत मिळकत कर भरलेल्या नागरिकांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बक्षीस वितरण

PT 3 Form | Pune Property Tax | PT-3 अर्ज भरून देण्याची मुदत 30 नोव्हेंबर पर्यंत | पुणेकरांना दिलासा

| महापालिकेने 15 दिवस मुदत वाढवली

PT 3 form | Pune Property tax | पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) कर आकारणी विभागाचे फॉर्म PT-3 (PMC Property tax Department PT 3 Form) भरून देण्याची मुदत 15 नोव्हेंबर रोजी संपत आहे. मात्र दिवाळीची सुट्टी आणि नागरिकांची मागणी पाहता ही मुदत 30 नोव्हेंबर पर्यंत वाढवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. याबाबत गुरुवारी आदेश जारी करण्यात येणार आहेत. अशी माहिती कर आकारणी व कर संकलन विभागाचे प्रमुख अजित देशमुख यांनी दिली. दरम्यान महापालिकेकडे आतापर्यंत 38 हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. आगामी 15 दिवसात ही संख्या 50-60 हजारापर्यंत जाऊ शकते. असा अंदाज प्रशासनाकडून वर्तवण्यात आला. (PMC Property tax Department PT 3 Form)
  पुणे महानगरपालिकेकडून (Pune Municipal Corporation) केवळ निवासी मिळकतींना (Residential property) स्वःवापराकरिता देण्यात येणारी ४०% सवलत (40% Discount) कायम करण्यात आली आहे. ज्या नव्याने बांधकाम झालेल्या निवासी मिळकतींची आकारणी ४०% सवलत न देता ०१.०४.२०१९ पासून पुढे झालेली आहे त्या सर्व मिळकतींना व ज्या मिळकतींची ४०% सवलत जी.आय.एस. सर्व्हे अंतर्गत दि.०१.०४.२०१८ पासून रद्द करण्यात आली आहे व अशा मिळकतींना ह्यापूर्वी फरकाची देयके (PMC property Tax bill) पाठवण्यात आली होती अशा सर्व मिळकतींना ४०% सवलतीचा लाभ ०१.०४.२०२३ पासून पुढील कालावधीकरिता देण्यात येत आहे. (PMC property Tax)
वरील सर्व मिळकतींना ४०% सवलतीचा लाभ आकारणी दिनांक/दुरुस्ती दिनांकापासून (म्हणजेच ज्या निवासी मिळकतींना दि. ०१.०४.२०१८ पासून दि. ३१.०३.२०२३ पर्यंत सवलत देय आहे परंतु दिली गेलेली नाही) ती सवलत घेणेकरिता व देण्यात आलेली सवलत ०१.०४.२०२३ पासून पुढील कालावधीकरिता सुरु राहणेकरिता मिळकतधारकाने PT-३ अर्ज (PT 3application form) संपूर्ण पुराव्यांसह १५ नोव्हेंबर २०२३ पूर्वी कर आकारणी व कर संकलन (pmc pune property Tax department) खात्याकडे सादर करणे आवश्यक राहील. असे महापालिकेकडून सांगण्यात आले होते. संबंधित मिळकतधारकांनी संपूर्ण मिळकतकर भरला असल्यास जादा जमा होणारी रक्कम PT-३ अर्ज भरून दिलेनंतर पुढील ४ वर्षांचे समान हप्त्यात आर्थिक वर्षाच्या देयकातून समायोजित करण्यात येईल. विहित मुदतीत अर्ज सादर न केल्यास मिळकतीचा वापर मिळकतधारक स्वः वापराकरिता करीत नसल्याचे गृहीत धरून अशा मिळकतीची सन २०२३-२४ करिता
दिली गेलेली सवलत रद्द करण्यात येईल. असे महापालिकेकडून सांगण्यात आले होते. दरम्यान ही मुदत आता महापालिका प्रशासनाने वाढवली आहे. आता ही मुदत 30 नोव्हेंबर असणार आहे. दिवाळीची सुट्टी आल्याने नागरिकांनी मुदत वाढवण्याची मागणी केली होती. त्यानुसार प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.  (Pune property tax)