स्मृती ईराणी यांच्या विरोधात पुणे महिला कॉंग्रेसचे आंदोलन
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विरोधात काल संसदेमध्ये केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी घोषणा देऊन अपमान केला. स्मृती ईराणी यांनी अगदी खालच्या पातळीवर जाऊन गोंधळ घातला. हातवारे करीत पूर्ण सदन डोक्यावर घेतले होते या कृत्याच्या निषेधार्थ आज महिला काँग्रेसच्या वतीने काँग्रेस भवन येथे ‘माफी माँगो माफी मांगो स्मृती ईराणी माफी मांगो, भ्रष्टाचारीणी स्मृती ईराणी या घोषणा देऊन निषेध आंदोलन करण्यात आले.
या प्रसंगी निषेध व्यक्त करताना महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा संगीता तिवारी म्हणाल्या की, ‘‘बेकायदेशिरपणे बार चालविणाऱ्या स्मृती ईराणीने आमच्या नेत्या मा. सोनियाजी गांधी यांच्याबद्दल माफी माँगो हे बोलणे हस्यास्पद आहे. सोनियाजी गांधी या त्यागमूर्ती असून देशाचे पंतप्रधान पद त्यांनी सोडून दिले. स्मृती ईराणी या स्वत: कोणत्या क्षेत्रातून आल्या आहेत आणि आपल्या मुलीला कोणत्या क्षेत्रात त्यांनी उभी केले आहे हे आधी त्यांनी पहावे. काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती. सोनियाजी गांधी यांच्यावर टिका केलेली आम्ही कदापीही सहन करणार नाही. बीन संस्कारी सून स्मृती ईराणी जर पुण्यामध्ये आल्या तर आम्ही त्यांना पुण्यात फिरणे मुश्किल करू.’’
यानंतर पुणे शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा पूजा आनंद यावेळी म्हणाल्या, ‘‘संसदेमध्ये झालेला प्रकार हा निदंनीय आहे. आमच्या नेत्या सोनियाजी गांधी यांच्याबद्दल आम्हाला नितांत आदर असून त्यांच्याबद्दल अशा प्रकारची वागणूक झाली तर आम्ही कदापीही सहन करणार नाही. सोनियाजी गांधी या नुकत्याच आजारातून बाहेर पडलेल्या असताना ज्या पध्दतीने स्मृती ईराणी संसदेत त्यांच्याशी वागल्या हे बघितल्यावर लक्षात येते की, गोव्यामधील अवैध दारू व्यवसायात झालेल्य बदनामीला लपविण्यासाठीच हे कृत्य स्मृती ईराणी यांनी केले. त्यामुळेच आज पुणे शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने स्मृती ईराणी यांचा आम्ही ‘जोडो मारो आंदोलन’ करून निषेध करीत आहोत.’’
यावेळी पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष रमेश बागवे, कमल व्यवहारे, लता राजगुरू, सुजाता शेट्टी, रजनी त्रिभुवन, संगीता पवार, स्वाती शिंदे, सिमा सावंत, सुंदरा ओव्हाळ, ताई कसबे, नंदा ढावरे, पपिता सोनावणे, सुजाता नेमुर, प्रियंका रणपिसे, प्राची दुधाने, छाया जाधव, आयेशा शेख, सिमा महाडिक, प्राजक्ता गायकवाड, अंजू डिसुझा, अश्विनी गवारे, ॲड. रूकसाना पठाण, सुरेखा माने, रूकसाना शेख आदींसह असंख्य महिला कार्यकर्त्यां या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.