कात्रज परिसरातील वाहतूक कोंडी वरून धिक्कार आंदोलन
| नाना भानगिरे यांच्या पुढाकारामुळे मुख्यमंत्र्यांशी झाला संवाद
कात्रज परिसरातील वाहतूक कोंडीसोडविण्यासाठी मेट्रो, उड्डाणपूल आणिग्रेड सेपरेटर या तिन्ही प्रकल्पांचा एकात्मिक वाहतूक आराखडा करण्यातयावा, यांसह पाणी, डीपी रस्ते, आरक्षितजागा आणि वाढलेला कर अशाविविध मागण्यांसाठी रविवारी सकाळीशेकडो नागरिकांनी कात्रज विकासआघाडीच्या नेतृत्त्वाखाली ‘धिक्कारआंदोलन’ केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी फोनद्वारे संवाद साधूनसर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यातआले. यामध्ये बाळासाहेबांची शिवसेनेचे शहर अध्यक्ष नाना भानगिरे (city president Nana Bhangire) यांचा पुढाकार महत्वाचा ठरला.
कात्रजमधील विविध समस्यांच्यापार्श्वभूमीवर नागरिकांनी कात्रज विकासआघाडी तयार केली आहे. रविवारीविविध मागण्यांसाठी आंदोलनाची हाक देण्यात आली होती. विविध मागण्यांचेफलक हातात घेऊन सकाळी शेकडोनागरिक चौकात एकत्र आले होते.या वेळी बाळासाहेबांच्या शिवसेनेचेशहरप्रमुख प्रमोद भानगिरे तेथे आले. त्यांनी नागरिकांच्या मागण्यांबाबत फोनद्वारे मुख्यमंत्र्यांशी संवाद घडवून आणला. यानंतर ‘धिक्कार आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे विकास आघाडीचे प्रमुख नमेश बाबर यांनी सांगितले. आंदोलनादरम्यान चौकात मोठी गर्दी झाल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.
(Katraj Traffic agitation)

आंदोलकांच्या मागण्या काय?
कात्रज वंडर सिटी ते कात्रज- कोंढवा रस्त्यावरील चालू असलेल्या उड्डाणपुलाचे काम चुकीच्या पद्धतीने सुरू आहे. ते त्वरित थांबवावे. भविष्याचा वेध घेऊन मेट्रो, उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर या तिन्ही प्रकल्पांचा एकात्मिक वाहतूक आराखडा (डीपीआर) करण्यात यावा. कात्रजसाठी सुरक्षित जागेत ‘महावितरण’चे अति उच्चदाब उपकेंद्र उभारावे, २४ तास पाणीपुरवठा योजना मार्गी लावावी, पालिकेत समावेश झालेल्या गावांना पायाभूत सुविधा द्याव्यात, वाढवण्यात आलेला कर कमी
करावा, अशा अनेक मागण्या या वेळी करण्यात आल्या.
करावा, अशा अनेक मागण्या या वेळी करण्यात आल्या.
मुख्यमंत्र्यांचा नागरिकांशी संवाद
आंदोलनादरम्यान बाळासाहेबांच्या शिवसेनेचे शहरप्रमुख भानगिरे यांनी नागरिकांचा आक्रोश प्रमोद पाहून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन लावला आणि माहिती दिली. यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी आंदोलकांशी संवाद साधला. ‘चांदणी चौकामधील वाहतूक कोंडीचा प्रश्न जसा सोडवला,
तसा कात्रज चौकातील वाहतुकीचा प्रश्न सोडवावा, नागरिकांना मूलभूत सुविधा द्याव्यात, महापालिकेचा वाढीव कर कमी करावा, अशा अनेक मागण्या मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्या. यावर शिंदे यांनी सर्व मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच वरिष्ठ पातळीवर बैठक घेऊन वाहतूक कोंडीसह सर्व प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले.
तसा कात्रज चौकातील वाहतुकीचा प्रश्न सोडवावा, नागरिकांना मूलभूत सुविधा द्याव्यात, महापालिकेचा वाढीव कर कमी करावा, अशा अनेक मागण्या मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्या. यावर शिंदे यांनी सर्व मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच वरिष्ठ पातळीवर बैठक घेऊन वाहतूक कोंडीसह सर्व प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले.