Manual scavengers | हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कर्मचारी नियुक्तीस मनाई करा

HomeBreaking Newsपुणे

Manual scavengers | हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कर्मचारी नियुक्तीस मनाई करा

Ganesh Kumar Mule Dec 20, 2022 7:37 AM

Resolutions of the subject committees : प्रशासक राजवट चालू झाल्यापासून विषय समित्यांचे ठराव संकेतस्थळावर उपलब्ध होत नाहीत 
Health Scheme | शहरी गरीब योजनेची वार्षिक उत्पनाची अट 1.60 लाख करा
Stray Dogs | भटक्या कुत्र्यांच्या समस्येबाबत सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन करा

हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कर्मचारी नियुक्तीस मनाई करा

| अभिजित बारवकर यांची मागणी

हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कर्मचारी (Manual scavangers) नियुक्तीस प्रतिबद्ध करण्याची मागणी माजी स्वीकृत सदस्य अभिजित बारवकर (Abhijit Baravkar) यांनी महापालिका आयुक्त (PMC Commissioner) यांच्याकडे केली आहे. तसेच त्यांचे  पुनर्वसन करणे अधिनियम 2013 कायद्याची प्रभावी अंबलबजावणी पुणे महापालिकेकडून (PMC Pune) करण्याची देखील मागणी करण्यात आली आहे.

बारवकर यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनानुसार पुणे मनपाच्या कार्यक्षेत्रामध्ये सफाई कर्मचारी चेंबर्स व मलवाहिन्यांतील साफसफाई सद्यस्थितीत पारंपारिक पद्धत, अपुऱ्या यंत्रसामुग्री व हाताने केली जातं आहे. दररोज मनपाचे व ठेकेदार नियुक्त सफाई कर्मचारी कोणत्याही सुरक्षा साधना शिवाय मलवाहिन्यामध्ये रॉड व इतर साहित्याने मैला काढून साफसफाई करत आहेत. काही कर्मचारी फावडे आणि घमेले घेऊन मैला काढत आहेत. अनेक वर्षांपासून विशिष्ट समाजघटकांकडून हे काम करण्यात येत असून ते अशिक्षित असल्याने त्याचा गैरफायदा घेण्यात येत आहे. (Pune Municipal corporation)

आपली महापालिका स्वच्छते बाबत राष्ट्रीय स्तरावर विविध पारितोषिके मिळवित असून उपरोक्त कायद्याचे अनुपालन करीत नाही ही बाब लाजिरवाणी आहे. याबाबत आम्ही 2 वेळा राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग, नवी दिल्ली यांचेकडे तक्रार केली असता, उप आयुक्त, घनकचरा विभाग यांनी याबाबत उपरोक्त नमूद कायद्याद्वारे कारवाई न करता राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग नवी दिल्ली यांस असे परत पुणे महापालिकेकडून घडणार नाही असे कळविले आहे. सदर कायद्याचे प्रभावी अनुपालन होणेकामी संबंधित उप आयुक्त, महापालिका सहाय्यक आयुक्त, संबंधित अभियंते, संबंधित आरोग्य निरीक्षक यांची जबाबदारी निश्चित करावी. त्याचे  अनुपालन पुणे महापालिकेकडून न झाल्यास त्या त्या महापालिका सहाय्यक आयुक्त यांस अथवा संबंधित अधिकारी यांना जबाबदार धरून सदर कायद्यानुसार त्यांचेवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी. असे ही निवेदनात म्हटले आहे. या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल आम्हास व राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग, नवी दिल्ली यांस लेखी स्वरूपात कळविण्यात यावा. अशी ही मागणी करण्यात आली आहे. (PMC Commissioner Vikram Kumar)