Prithviraj B P IAS | मुख्य खात्याकडील तरतुदीतून क्षेत्रीय स्तरावरील कामे करण्यावरून अतिरिक्त आयुक्तांनी दर्शवली नाराजी | मुख्य खात्याचा अभिप्राय देखील नाही घेतला जात!
PMC Ward Officer Work – (The Karbhari News Service) – क्षेत्रीय कार्यालय स्तरावर उप आयुक्त (परिमंडळ क्र. १ ते ५) यांचेमार्फत विविध क्षेत्रीय कार्यालयासाठी मुख्य खात्याकडील तरतुदीतून क्षेत्रीय स्तरावरील कामे करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात येत आहेत. यावरून अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी यांनी नाराजी दर्शवली आहे. (Pune Municipal Corporation – PMC)
अतिरिक्त आयुक्त यांनी म्हटले आहे कि, प्रामुख्याने मुख्य खात्याकडील प्रकल्पीय कामासाठी जी तरतूद उपलब्ध असते त्यातून क्षेत्रीय स्तरावरील कामाबाबतचा प्रस्ताव वित्तीय समितीकडे मुख्य खात्याचा अभिप्राय न घेता सादर केली जातात. त्यामुळे मुख्य खात्यास प्रकल्पीय कामासाठी उपलब्ध असलेली तरतूद अपूरी पडते. त्यामुळे याबाबत आता अतिरिक्त आयुक्त यांनी नियमावली ठरवून दिली आहे.
पुणे महानगरपालिकेच्या कामाचा प्राधान्यक्रम निश्चित करणे, गरजेच्या महत्वाच्या कामांना निधी दणे, अनावश्यक खर्च टाळणे तसेच जमा खर्चाचा ताळमेळ घालणेसाठी वित्तीय उपाययोजना करणेस्तव प्रशासकीय स्तरावर महापालिका आयुक्त यांचे अध्यक्षतेखाली वित्तीय समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. त्यामध्ये संबंधित खातेप्रमुख यांचेकडून कामांबाबतचे प्रस्ताव वित्तीय समितीकडे सादर करण्यात येतात.
वित्तीय समितीने मुख्य खात्याकडील तरतूदीबाबत मान्यता दिल्यानंतर क्षेत्रीय कार्यालय स्तरावर कामे करण्यासाठी वर्गीकरण / विभाजन याबाबतच्या प्रस्तावाबाबत अशी असणार आहे नियमावली
१) प्रस्तावित ठिकाणी प्रायमुव्ह कन्सल्टंट यांचेकडून तयार करण्यात आलेल्या मास्टर प्लॅन नुसार कामाचे आवश्यकतेबाबतचे प्रमाणपत्र क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त व उपआयुक्त यांनी प्रस्तावासोबत सादर करून पूर्वगणनपत्रक तयार करण्यात यावे.
२) ज्या ठिकाणी काम करावयाचे आहे तेथे यापूर्वी कधी काम करण्यात आले होते त्याचा दोष निवारण कालावधी संपला आहे अगर कसे ? याबाबतची पडताळणी करण्यात यावी.
३) जागेवर काम करण्याची आवश्यकता आहे का ? त्यानुसार प्रत्यक्ष काम सुरू करणेपूर्वी काम चालू असताना आणि काम पूर्ण झालेनंतर अश्या प्रत्येक टप्प्यावर कामाचे छायाचित्रण, व्हिडिओ रेकॉर्डिंग करून त्याचे रेकॉर्ड जतन करण्यात यावे. सदर रेकॉर्ड पडताळूनच कामाची देयके अदा होतील याची दक्षता घ्यावी.

COMMENTS