पुणे महापालिकेतील बदली घोटाळा रोखा
| अरविंद शिंदे यांची नगरविकास मंत्र्यांकडे मागणी
पुणे | महापालिकेत वर्ग क्रमांक 1, 2 व 3 मधील कोणत्याही अधिका-याची त्याच्या अधिपत्याखालील विभागात एकाधिकारशाही तयार होऊ नये म्हणून तीन वर्षे कालावधी पूर्ण झाल्यानंतर अन्य विभागात बदली होण्याबाबत कायदे / शासकीय नियमावली अस्तित्वात आहे. सदयस्थितीत प्रशासक कालावधी मध्ये कायदयाची अमंलबजावणी करण्यास पूर्ण संधी मिळाल्याने मागील वर्षभरात पुणेकर नागरिकांना सकारात्मक बदल घडण्याची आशा होती. मात्र दुर्दैवाने प्रशासक कालावधीत महापालिकेतील सर्वच विभागातील भ्रष्टाचार पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने वाढला असल्याचे दिसून येत आहे. त्याचे मुख्य कारण हे शासनाकडून प्रति नियुक्तीवर आलेल्या अधिका-यांनी जाणीवपूर्वक रोखून ठेवलेली सेवक बदली प्रक्रिया हे आहे. असा आरोप काँग्रेस शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केला आहे. तसेच बदली घोटाळा रोखण्याची मागणी राज्याच्या नगरविकास मंत्र्यांकडे केली आहे. (PMC Pune)
शिंदे यांच्या निवेदनानुसार सदयस्थितीत मनपामध्ये एकाच विभागात 3 वर्षापेक्षा जास्त वेळ काम करायचे असेल तर वर्ग 1 पाठी 20 लाख, वर्ग 2 व 3 साठी तर 10 लाख त अपेक्षित विभागात बदली करून घ्यावयाची असेल तर 10 लाख रूपये असा बाजार असल्याची ओरड आहे. आधी काम केलेल्या मलईदार विभागात काम करायची तिव्र इच्छा असल्यास वर्ग कोणताही असला तरी बदलीचा भाव रूपये 30 लाख असल्याची चर्चा आहे. “भावाबद्दल कोणतीही घासाघिस करून नये. आम्हांला उत्पन्नाचा काही भाग वरिष्ठांना दयावा लागतो,” असे अधिकारी नाव न घेण्याच्या अटीवर खाजगीत सांगत आहेत. तर दुसरीकडे स्वच्छ प्रामाणिक अधिका-यांना मात्र गुणवत्ता असतांनाही आर्थिक तडजोड न करता आल्याने बिनमहत्त्वाच्या खात्यात काम करणे भाग पडत आहे. (Pune municipal corporation)
शिंदे यांनी निवेदनात पुढे म्हटले आहे कि, पैसे फेकून नेमणूक करून घेतल्यामुळे आलेल्या मिजासेतून “माझे कोणीही वाकडे करू शकत नाही”, अशा उद्दाम मानसिकतेच्या अभियंत्यामुळे नागरिकांची कामे रखडली जावून भिक नको पण कुत्रे आवर’ अशी अवस्था पुणेकरांची झालेली आहे. महत्त्वाच्या पत्रांना खोटी उत्तरे देणे, भ्रष्टाचार संबंधित तकारी जाणीवपूर्वक दाबून ठेवणे. वारंवार निदर्शनास आणून देखील लेखी उत्तरे न देणे असे सेवाहमी कायदयाचे सर्रास उल्लंखन करण्याचे प्रकार चालू आहेत. दुर्दैवाने मी स्वतः सुध्दा याचा अनुभव घेतलेला आहे . बांधकाम विभाग हा त्याचे एक उत्तम उदाहरण ठरावा अशी वस्तुस्थिती आहे. (Arvind Shinde)
शिंदे म्हणाले, अनेक कनिष्ठ अभियंता, सहाय्यक अभियंता, कार्यकारी अभियंता इत्यादी अधिकारी 3 वर्षे पूणे होवून देखील तेथेच कार्यरत असून, काही नामचिन आणि विश्वासू मनसबदार तर खाते प्रमुखांच्या अधिपत्याखाली अनेक विभागात नाममात्र बदली दाखवून प्रत्यक्ष कामाकाजास त्याच विभागात किंवा काही कमी कालावधीत परत वाजत-गाजत घरवापसी कार्यक्रम करून पेढे वाटण्याचे उदयोग सुरू आहेत. मुळात जर खाते प्रमुखच जर नियम / कायदेभंग करून वर्षानुवर्षे एकाच खात्याचे प्रतिनिधित्व करत असतील तर त्या खात्याकडून लोकांभिमूख प्रशासनाची कशी अपेक्षा करता येईल ? या सर्व गदारोळात महापालिकेच्या कामकाजाचा दर्जा खालावत असून, तो ग्रामपंच्यातीच्या खाली गेला आहे . असे खेदाने नमुद करावे लागत आहे. आपण या सर्व बाबींच गंभीरपणे विचार करून लाच देऊन होत बदल्या न होऊ अधिकारी आणि लाच घेऊन बदल्या रोखणारे अधिकारी यांच्यावर कडक कारवाई करावी. येत्या 10 दिवसात सदर गैरप्रकार / भ्रष्टाचार न रोखल्यास पुणे शहर कॉंग्रेस तर्फे तिव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिंदे यांनी दिला आहे.