प्रभागाच्या कच्च्या आराखड्याचे १५ जानेवारी पर्यंत करावे लागणार सादरीकरण
राज्य निवडणूक आयोगाचे आदेश
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना कशी असेल याची प्रतीक्षा काही केल्या संपेना. पुण्याच्या प्रभागाच्या कच्च्या आराखड्याचे 6 जानेवारी रोजी सादरीकरण करण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिला होता. पुन्हा एकदा यास मुदतवाढ देण्यात आली आहे. आता १५ जानेवारीपर्यंत प्रभागाच्या कच्च्या आराखड्याचे सादरीकरण करावे लागणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने तसे आदेश दिले आहेत.
शासनाने दि. १५ डिसेंबर, २०२१ रोजी प्रसिध्द केलेल्या महाराष्ट्र महानगरपालिका (प्रभागांमध्ये राखीव जागांचे वाटप करणे आणि त्या जागा चक्रानुक्रमे फिरविण्याची पध्दत) नियम, २०२१ अन्वये बहुसदस्यीय प्रभाग पध्दतीनुसार (त्रिसदस्यीय) आरक्षण कशा पध्दतीने निश्चित करावे हे विहित केले आहे
निर्णयास अनुसरुन जोपर्यंत राज्य शासन त्रिस्तरीय चाचणी करुन स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाचे प्रमाण निश्चित करत नाही तोपर्यंत आगामी सार्वत्रिक / पोटनिवडणुकांमध्ये नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा सर्वसाधारण म्हणून अधिसूचित करुन निवडणुका घेण्याचे आदेशित केले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाकरिता कोणत्याही जागा देय होणार नाहीत.
दरम्यान पुण्याच्या प्रभागाच्या कच्च्या आराखड्याचे 6 जानेवारी रोजी सादरीकरण करण्याचा आदेशराज्य निवडणूक आयोगाने दिला होता. पुन्हा एकदा यास मुदतवाढ देण्यात आली आहे. आता १५ जानेवारीपर्यंत प्रभागाच्या कच्च्या आराखड्याचे सादरीकरण करावे लागणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने तसे आदेश दिले आहेत.
सूत्रांकडून अशी माहिती मिळत आहे कि, आयोगाचे बरेच कर्मचारी कोविड पॉजीटीव आढळून आले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा ही मुदतवाढ मिळू शकते. त्यामुळे प्रभाग रचना अजून लांबणीवर पडणार आहे.
COMMENTS