MSCE : पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 20 फेब्रुवारी रोजी

Homeपुणेमहाराष्ट्र

MSCE : पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 20 फेब्रुवारी रोजी

Ganesh Kumar Mule Dec 02, 2021 11:46 AM

Voter Awareness | निवडणूक कर्मचाऱ्यांकडून घरोघरी जाऊन मतदार जागृती
7 Principles of Investing Hindi summary | निवेश के 7 सिद्धांत जिनका उपयोग आप आज से शुरू कर सकते हैं
NCP Youth | आरटीई ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याकरिता मुदतवाढ | राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मागणीला यश

पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 20 फेब्रुवारी रोजी

पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 5 वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 8 वी) 20 फेब्रुवारी 2022 रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यात एकाच वेळी घेण्यात येणार आहेत.

शासनमान्य शाळांमधून  2021-22 या शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन परीक्षा आणि शासकीय विद्यानिकेतन परीक्षेस प्रविष्ठ होण्यासाठी तसेच आठवीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व माध्यमिक परीक्षेस प्रविष्ठ होण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन आवेदनपत्र परिषदेच्या www.mscepune.in  आणि https://mscepuppss.in  या संकेतस्थळावर 1 डिसेंबर 2021 पासून उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

वरील सर्व परीक्षा 20 फेब्रुवारी रोजी सर्व जिल्ह्यात एकाच वेळी घेण्यात येतील.  परीक्षेची अधिसूचना संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून अधिक माहितीसाठी संकेतस्थळाला भेट द्यावी असे आयुक्त तुकाराम सुपे यांनी कळविले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0