Pramod Nana Bhangire | पुणे शहरातील रस्त्यावरील खड्ड्याबाबत अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाई करा | शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांची मागणी
Pramod Nana Bhangire | पुणे | पुणे महानगरपालिकेने (PMC Pune) यापूर्वी शहरात जिथे खड्डे (Pune Potholes) बुजवण्याचे काम केले होते त्याच ठिकाणी खड्यांची पुनर्निर्मिती होवून रस्त्यावर खड्यांची आहे तशीच परिस्थिती स्थिती निर्माण झाली आहे. तरी महानगरपालिकेने तातडीने संबंधित विभागाचे खातेप्रमुख (HOD) व ठेकदारांवर ( कठोर कारवाई करून कामाच्या योग्य नियोजनातून प्रशस्त आणि सुधारित पक्क्या रस्त्यांचे वेळीच कामकाज सुरू करावे. अशी मागणी शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे (Shivsena Pune President Pramod Nana Bhangire) यांनी महापालिका आयुक्त (PMC Commissioner) यांच्याकडे केली आहे. (Pune Municipal Corportion)
भानगिरे यांनी दिलेल्या निवेदनानुसार जुलै महिन्यात पुणे महानगरपालिकेने शहरातील रस्त्यांच्या डागडुजीसाठी सुमारे तीनशे कोटींची निविदा काढून रस्त्यांचे खड्डे बुजविले होते. त्यावर ऑगस्ट महिन्यातच खड्डे होवून खड्यांचे काम निकृष्ट दर्जाचे झाले होते. पुन्हा आता सप्टेंबर महिन्याच्या पावसाने पुन्हा एकदा पुण्यातील विविध भागातील रस्ते उखडून रस्त्याच्या बांधकामातील खडी रस्त्यावर सर्वत्र पसरली आहे. अनेक रस्ते हे खड्डेमय झाले आहेत. यामुळे वाहतुकीसाठी मोठा अडथळा निर्माण होत असून कात्रज- कोंढवा चौकात (Katraj-Kondhwa Chowk) मोठे खड्डे पडून रस्त्यांची चाळण झालेली असून मोठे खड्डे पडले आहेत. मोठ्या खड्यांमुळे अपघात होत असून त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. (Pune Potholes News)
भानगिरे यांनी पुढे म्हटले आहे कि, महानगरपालिकेने यापूर्वी शहरात जिथे खड्डे बुजवण्याचे काम केले होते त्याच ठिकाणी खड्यांची पुनर्निर्मिती होवून रस्त्यावर खड्यांची आहे तशीच परिस्थिती स्थिती निर्माण झाली आहे. तरी महानगरपालिकेने तातडीने संबंधित विभागाचे खातेप्रमुख व ठेकदारांवर कठोर कारवाई करून कामाच्या योग्य नियोजनातून प्रशस्त आणि सुधारित पक्क्या रस्त्यांचे वेळीच कामकाज सुरू करावे. तसेच वाहतूक कोंडी तसेच खड्यांमुळे नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोयीवर वेळीच उपायोजना करावी. अशी मागणी भानगिरे यांनी केली आहे.
—-