Pramod Nana Bhangire | आरोग्य कोठीत सुपरवाइजर गैरहजर; तरीही त्याची मस्टर ला हजेरी | संबंधित कर्मचारी आणि ठेकेदारावर कारवाई करण्याची प्रमोद नाना भानगिरे यांची मागणी!
Pune PMC News – (The Karbhari News Service) – हडपसर मतदारसंघात महापालिकेच्या विविध ठिकाणी आरोग्य कोठी आहेत. या माध्यमातून परिसरात स्वच्छता करण्याचे काम केले जाते. मात्र परिसरातील विभिन्न कोठीमध्ये सकाळी फेरफटका मारल्यानंतर लक्षात आले कि तिथे सुपरवाइजर हजर नसतात. तरीही त्यांची हजेरी लावली जाते. शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. संबंधित कर्मचारी आणि ठेकेदारावर कारवाई नाही केली तर आंदोलन करण्याचा इशारा भानगिरे यांनी दिला आहे. (Pune Municipal Corporation – PMC)
हडपसर मतदार संघात हडपसर मुंढवा, एनआईबीएम, हांडेवाडी श्रीराम चौक कोठी, ग्रीन सोसायटी समोरील कोठी, सातव नगर, या ठिकाणी आरोग्य कोठ्या आहेत. या माध्यमातून परिसरात पहाटे पासून सफाई च्या रूपाने स्वच्छता केली जाते. कोठीवर देखरेख करण्याचे काम हे सुपरवाइजर चे असते. मात्र गेल्या काही दिवसापासून स्वच्छता होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या. त्यामुळे या कोठी परिसरात भानगिरे यांनी सकाळीच फेरफटका मारला. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले कि कोठीत सुपरवाइजर हजर नसतात. तरीही त्यांची हजेरी लावली जाते. यात महापालिकेचे देखील नुकसान आहे. असे भानगिरे यांनी म्हटले आहे. भानगिरे यांनी सांगितले की सुपरवाइजर हे ठेकेदाराचे कर्मचारी आहेत. हे लोक मनमानी करताना दिसून येत आहेत. त्यामुळे यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. तशी मागणी आम्ही प्रशासनाकडे केली आहे. कारवाई नाही केली तर आंदोलन करण्याचा इशारा भानगिरे यांनी दिला आहे.
—-
COMMENTS