Pramod Nana Bhangire Hadapsar | हडपसर मधून प्रमोद नाना भानगिरे यांना महायुतीची उमेदवारी मिळावी यासाठी हजारो शिवसैनिकांचे प्रभू श्रीरामाला साकडे

HomeBreaking News

Pramod Nana Bhangire Hadapsar | हडपसर मधून प्रमोद नाना भानगिरे यांना महायुतीची उमेदवारी मिळावी यासाठी हजारो शिवसैनिकांचे प्रभू श्रीरामाला साकडे

Ganesh Kumar Mule Oct 20, 2024 9:55 PM

Katraj-Kondhwa Road Incident | आजी माजी आमदारामुळे कात्रज-कोंढवा रस्ता झाला मृत्यूचा सापळा! – प्रशांत जगताप
Pramod Nana Bhangire | पुण्यातील शिवसैनिक थेट मुख्यमंत्र्यांचे निवासस्थानी मुंबईकडे पायी रवाना
Hadapsar Vidhansabha Constituency | नरेंद्र मोदी सभा : हडपसर विधानसभा मतदार संघातून 6 हजाराहून अधिक लोक उपस्थित राहणार! | शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांची माहिती 

Pramod Nana Bhangire Hadapsar | हडपसर मधून प्रमोद नाना भानगिरे यांना महायुतीची उमेदवारी मिळावी यासाठी हजारो शिवसैनिकांचे प्रभू श्रीरामाला साकडे

Hadapsar Vidhansabha – (The Karbhari News Service) – हडपसर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांना महायुतीची उमेदवारी मिळावी यासाठी प्रभू श्रीरामचंद्राच्या शिल्पासमोर नतमस्तक होत साकडे घातले. विशेष म्हणजे या पूर्णकृती शिल्पा चे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काहीच दिवसापूर्वी हडपसर मध्ये संपन्न झाले होते. (Pramod Nana Bhangire)

 

पुणे शहरातील आठपैकी एकाही विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा आमदार नाही. त्यामुळे पुणे शहरात हिंदुत्वाचा झंझावात येण्यासाठी पुणे शहरातून जनतेच्या माध्यमातून निवडून आलेला शिवसेनेचा आमदार असणे अत्यंत आवश्यक आहे‌. शहरातील सर्वच मतदारसंघाचा विचार करता, हडपसर शिवसेनेसाठी अत्यंत अनुकुल आह, शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोदनाना भानगिरे हे पुणे महानगरपालिकेतून तब्बल तीन वेळा नगरसेवक म्हणून जनतेतून निवडून आलेले असून, त्यांच्या नगरसेवकपदाच्या कार्यकाळात हडपसरचा मोठ्या प्रमाणात विकास केला.

 

सैलानी पार्क ते रामटेकडी इंडस्टीयल इस्टेट या भागातील ड्रेनेज लाइनचा प्रश्न, जे.एस.पी.एम. महाविद्यालय,चिंतामणी नगर आदि भागातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न, प्रमोद नाना भानगिरे यांनी सोडवला आहे‌, गाडीतळ परिसरातील वाहतूकीचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग आणि परिवहन मंत्री नितीनजी गडकरी यांची थेट भेट घेत मतदारसंघातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी भगीरथ प्रयत्न केले आहे तसेच ते जनता दरबारच्या माध्यमातून ते कायम नागरिकांच्या अडचणींचे निराकरण करत असतात. राज्यस्तरीय सेनाकेसरी कुस्ती स्पर्धा, राज्यस्तरीय मुख्यमंत्री बैलगाडा शर्यत, या सारख्या उपक्रमातून त्यांनी ग्रामीण संस्कृतीचा मोठा सम्मान केला आहे.

तसेच श्रीराम चौकात अनेक अडचणींवर यशस्वी मात करत, सार्वजनिक ठिकाणी उभारण्यात आलेल्या देशातील पहिल्या प्रभु श्रीरामाच्या पुर्णाकृती शिल्पाची उभारणी करुन हिंदुत्वाचा नारा देखील बुलंद केला आहे.
प्रमोदनाना भानगिरे यांच्याकडे हायटेक हडपसरचा पुर्ण आराखडा तयार असून ,त्यांना हडपसरचे विधानसभेत प्रतिनिधीत्व करायची संधी मिळाल्यास पुण्यासारख्या महानगरचा भाग असून देखील ग्रामीण चेहरा न विसरलेल्या हडपसरचा सर्व समतोल विकास होईल.

त्यामुळे यावेळी हडपसरच्या आमदारकीची माळ शिवसेना शहरप्रमुख प्रमोदनाना भानगिरे यांच्याच गळ्यात पडायला हवी,असी भावना हजारो नागरिकांच्या वतीने यावेळी व्यक्त करण्यात आली.यावेळी, हडपसर मतदारसंघातील जेष्ठ नागरिक, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.