PMRDA Pune | पीएमआरडीए प्राधिकरण सभा पुढे ढकलली!
PMRDA Pune | पीएमआरडीए (PMRDA) क्षेत्रातील सुमारे ७ हजार चौ.कि.मी.हून अधिक क्षेत्रफळाचा प्रारुप विकास आराखडा (PMRDA Draft Development Plan) तयार करण्यात आला आहे. त्यावर हरकती सूचना (Suggestion and objections) घेऊन आराखडा अंतिम करण्यात आला आहे. त्याला मंजूरी देण्यासाठी राज्य सरकारने 17 जून ला बैठक बोलावली होती. मात्र ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. अशी माहिती पीएमआरडीए प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. (PMRDA Pune)
पीएमआरडीए क्षेत्रातील सुमारे ७ हजार चौ.कि.मी.हून अधिक क्षेत्रफळाचा प्रारुप विकास आराखडा (PMRDA Draft Development Plan) तयार करण्यात आला आहे. यामध्ये पुणे महापालिकेमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या २३ गावांचाही समावेश आहे. या आराखड्यावर हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या. पीएमआरडीएच्या नियोजन समितीवर लोकप्रतिनिधींची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच परआराखड्यावरील हरकती व सूचनांवर सुनावणी घेउन आराखडा अंतिम करण्याची प्रक्रिया पार पाडण्यासाठी सुनावणीसाठी समितीची स्थापना करण्यात आली होती. सगळी प्रक्रिया करून आराखडा अंतिम देखील करण्यात आला आहे. त्यानुसार या योजनेला मंजूरी देण्यासाठी 17 जून ला सरकारकडून बैठक देखील बोलावण्यात आली होती. सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ही बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आली होती. एवढे सगळे अंतिम झाले असताना देखील ऐन वेळेला हा निर्णय बदलण्यात आला आणि या योजनेला सहा महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. (PMRDA Pune) दरम्यान 17 जून ची बैठक देखील रद्द करण्यात आली आहे. त्याचे वेळापत्रक अजून ठरलेले नाही. अशी माहिती पीएमआरडीए प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
—
News Title | PMRDA Pune | PMRDA authority meeting postponed!