PMRDA Lottery | पीएमआरडीएकडून घरांच्या लॉटरीसाठी मुदतवाढ |  २० फेब्रुवारीपर्यंत करता येणारअर्ज !

Homeadministrative

PMRDA Lottery | पीएमआरडीएकडून घरांच्या लॉटरीसाठी मुदतवाढ |  २० फेब्रुवारीपर्यंत करता येणारअर्ज !

Ganesh Kumar Mule Jan 27, 2026 7:45 PM

Bodybuilding Competetion |  पुणे जिल्हास्तरीय पुणे श्री 2025 या स्पर्धेमध्ये प्रथमच खेळाडूंसाठी पाच गदांचा सन्मान
Encroachment Dept.| PMC | पथारी व्यावसायिकांना दिलासा | जुलै अखेर पर्यंत तीन हफ्त्यात थकबाकी द्यावी लागणार 
Kalicharan Baba | कालीचरण बाबाच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक!

PMRDA Lottery | पीएमआरडीएकडून घरांच्या लॉटरीसाठी मुदतवाढ |  २० फेब्रुवारीपर्यंत करता येणारअर्ज !

 

PMRDA Pune – (The Karbhari News Service) –  पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) घर खरेदीची इच्छा असलेल्या नागरिकांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. पेठ क्र. १२ तसेच पेठ क्र. ३०-३२ येथील सदनिकांच्या लॉटरीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीची मुदत वाढवण्यात आली असून, आता नागरिकांना २० फेब्रुवारी २०२६ पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. (Pune news)

पीएमआरडीएने पेठ क्र. १२ मधील ३४० तसेच पेठ क्र. ३०-३२ मधील ४९३ अशा एकूण ८३३ शिल्लक सदनिकांसाठी १४ डिसेंबर २०२५ रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती. या सदनिकांसाठी ऑनलाइन नोंदणीची मूळ अंतिम मुदत २७ जानेवारी २०२६ होती. मात्र, अधिकाधिक नागरिकांना या गृहनिर्माण योजनेचा लाभ घेता यावा आणि त्यांच्या घराचे स्वप्न साकार व्हावे, या उद्देशाने प्रशासनाने अर्ज करण्याची मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

या मुदतवाढीचा लाभ घेऊन जास्तीत जास्त नागरिकांनी या सुवर्णसंधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन पीएमआरडीएच्या सहआयुक्त (जमीन व मालमत्ता विभाग) पूनम मेहता यांनी केले आहे. अर्ज प्रक्रियेसंदर्भात काही अडचण असल्यास किंवा अधिक माहितीसाठी नागरिकांनी पीएमआरडीएच्या ०७९३५४८३०४२ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: