PMRDA Lottery | पीएमआरडीएतर्फे 1337 सदनिकांच्या लॉटरीचा शुभारंभ  | इच्छुकांना परवडणाऱ्या घरासाठी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तापासून करता येणार अर्ज

Homeadministrative

PMRDA Lottery | पीएमआरडीएतर्फे 1337 सदनिकांच्या लॉटरीचा शुभारंभ | इच्छुकांना परवडणाऱ्या घरासाठी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तापासून करता येणार अर्ज

Ganesh Kumar Mule Oct 11, 2024 5:59 PM

Pune Education News | गाडकवाडी गाव “विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या” माध्यमातून झाले चकाचक! | गावच्या वतीने स्मृतीचिन्ह देऊन केला शिबिरार्थींचा यथोचित सन्मान!”
Gratuity Eligibility | नोकरी पाच वर्षांपेक्षा कमी असली तरीही तुम्ही ग्रॅच्युइटीचे पात्र बनता, कसे जाणून घ्या?
UPSC Results | केंद्रीय लोकसेवा आयोगाचा (UPSC) निकाल जाहीर | महाराष्ट्रातील 60 हून अधिक उमेदवारांना घवघवीत यश

PMRDA Lottery | पीएमआरडीएतर्फे 1337 सदनिकांच्या लॉटरीचा शुभारंभ

| इच्छुकांना परवडणाऱ्या घरासाठी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तापासून करता येणार अर्ज

 

PMRDA Pune Lottery – (The Karbhari News Service) – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या पेठ क्र. १२ येथील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत EWS (१ BHK) प्रवर्गातील ४७ सदनिका व LIG (२ BHK) प्रवर्गातील ६१४ सदनिका आणि पेठ क्र. ३०-३२ येथील परवडणारी घरे योजनेअंतर्गत EWS (१ RK) प्रवर्गातील ३४७ सदनिका व LIG (१ BHK) प्रवर्गातील ३२९ सदनिका अशा एकूण १३३७ शिल्लक सदनिकांच्या लॉटरीचा शुभारंभ शुक्रवारी (दि.११) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे (Dr Yogesh Mhase IAS) यांच्या हस्ते करण्यात आला. (Pune PMRDA)

इच्छुक नागरिकांना अर्ज करण्यासाठी नोंदणीची प्रक्रिया ११ ऑक्टोबर २०२४ पासून सुरु करण्यात आलेली असून सोडतीसाठी Online अर्ज करण्यास १२ ऑक्टोबर २०२४ ते १२ नोव्हेबर २०२४ पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. पेठ क्र. १२ येथील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत EWS (१BHK) प्रवर्गातील २९.५५ चौ.मी. क्षेत्राच्या सदनिकांची किंमत रु. १५,७४,४२४/- इतकी असून LIG (२ BHK) प्रवर्गातील ५९.२७ चौ.मी. क्षेत्राच्या सदनिकांची किंमत रु. ३५,५७,२००/- इतकी आहे. तर पेठ क्र. ३०-३२ येथील परवडणारी घरे योजनेअंतर्गत EWS (१ RK) प्रवर्गातील २५.५२ चौ.मी. क्षेत्राच्या सदनिकांची किंमत रु. २०,९०,७७१/- इतकी असून LIG (१ BHK) प्रवर्गातील ३४.५७ चौ.मी. क्षेत्राच्या सदनिकांची किंमत रु. २८,३२,२०८/- इतकी आहे.

सदर गृहप्रकल्पातील EWS प्रवर्गातील सदनिकांसाठी रु.५०००/- इतकी अनामत रक्कम असून LIG प्रवर्गातील सदनिकांसाठी रु.१०,०००/- इतकी अनामत रक्कम ठेवण्यात आलेली आहे. तसेच दोन्ही प्रवर्गासाठी GST सह फॉर्म फी रु. ७०८/- ठेवण्यात आलेली आहे.

लॉटरीची संपूर्ण प्रक्रिया ही संगणकीय प्रणालीद्वारे असल्याने यामध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप नाही. या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ करून घ्यावा व मुदतीपूर्वी Online अर्ज सादर करावेत. असे आवाहन महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी केले आहेत. यावेळी अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, मुख्य अभियंता अशोक भालकर, प्र. सह आयुक्त हिम्मत खराडे, तहसीलदार अभिजीत जगताप यांच्यासह आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Online अर्ज भरण्याकरिता http://housing.pmrda.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अधिक माहितीसाठी – Helpline No.- ०२२६२५३१७२७.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0