PMRDA Latest News | 8 वर्ष झाली तरी PMRDA चे ऑडिट नाही! | मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
PMRDA Latest News | पुणे | पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (Pune Mahanagar Regional Devlopment Authority) अर्थात PMRDA ची स्थापना होऊन 8 वर्ष झाली तरीही प्राधिकरणाने अजून ऑडिटच (PMRDA Audit) केले नाही. प्राधिकरणाच्या निष्काळजीपणा बद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे याची तक्रार नागरी तक्रार नागरी हक्क संस्थेचे सुधीर कुलकर्णी (Sudhir Kulkarni Nagri Hakk Sanstha) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे केली आहे.
पीएमआरडीए या संस्थेची स्थापना 2016-17 रोजी झाली. त्यानंतर एमएमआरडीए कायद्यानुसार त्याला दर्जा प्राप्त झाला. पीएमआरडीए स्थापन होऊन ८ वर्षे झाली. कुलकर्णी यांनी माहितीच्या कायद्याच्या अंतर्गत पीएमआरडीए कडे त्यांच्या लेखापरीक्षणाचा (Audit) अहवाल १३/१२/२३ रोजी मागितला ला होता. कुलकर्णी यांना पीएमआरडीए ने ३/९/२४ रोजी पत्र देऊन आमचे लेखा परीक्षण झाले नाही असे सांगितले. पीएमआरडीए सारख्या कायद्याने स्थापित झालेल्या संस्थेचे आठ वर्ष लेखापरीक्षण होत नाही ही बाब गंभीर आहे. त्यामुळे कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे. संस्थेला तातडीने लेखापरीक्षण करून घेण्याचे आदेश द्यावेत. अशी मागणी कुलकर्णी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.