PMRDA | Busan | पीएमआरडीए आणि बुसान मेट्रोपॅालीटन कार्पोरेशन यांच्यातील सामंजस्य करारावर शिक्कामोर्तब 

HomeपुणेBreaking News

PMRDA | Busan | पीएमआरडीए आणि बुसान मेट्रोपॅालीटन कार्पोरेशन यांच्यातील सामंजस्य करारावर शिक्कामोर्तब 

Ganesh Kumar Mule Oct 07, 2023 8:16 AM

PMRDA | Supriya Sule | पीएमआरडीए क्षेत्रामधील घरकुलासाठी आर्किटेक्टच्या डीपीआरची अट रद्द होणार
Hinjewadi- Shivajinagar Metro | हिंजवडी शिवाजीनगर मेट्रो साठी केंद्र शासनाकडून ४१० कोटी प्राप्त
PMRDA : PMRDA च्या प्रारूप विकास आराखड्यावरील सुनावणीसाठी 7 सदस्यीय समिती गठीत 

PMRDA | Busan | पीएमआरडीए आणि बुसान मेट्रोपॅालीटन कार्पोरेशन यांच्यातील सामंजस्य करारावर शिक्कामोर्तब

 

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) आंतरराष्ट्रीय शाश्वत विकास उद्दिष्टांनुसार पुण्याचे विकासाला चालना देण्यासाठी शहरी पायाभूत सुविधा पुरविण्याकरीता सहकार्याच्या विविध पद्धतींचा अवलंब करण्यासाठीचा एक प्रयत्न स्वरुप दक्षिण कोरिया येथील ‘बुसान मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन’ (Busan Metropolitan Corporation) सोबत च्या सामंजस्य करारावर ५ ऑक्टोबर रोजी स्वाक्षरी केली.

या सामंजस्य कराराचा उद्देश सदर सामंजस्य करारामध्ये नमुद केले नुसार परस्पर हितसंबंध आणि विशेष कौशल्य असलेल्या क्षेत्रांमध्ये आणि इतर सामाजीक क्षेत्रांमध्ये परस्पर सहकार्य सुलभ करणे, दीर्घकालीन सहयोग दृढ व वृध्दिंगत करणेच्या दृष्टिकोनातून मुहुर्तमेढ स्थापणे तसेच माहितीची परस्पर देवाणघेवाण करणे आणि माहिती, समानता, परस्पर लाभ आणि सहकार्याच्या तत्त्वांनुसार, पथदर्शी प्रकल्प किंवा संकल्पनेवर आधारित प्रत्यक्ष योजनेची कल्पना व अंमलबजावणी करणे हा आहे. (PMRDA Pune)

बुसान मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशनचे अध्यक्ष श्री किम  तसेच बुसान कार्पोरेशनचे नियोजन विभाग आणि कॉम्प्लेक्स बिझनेस विभागातील इतर अधिकाऱ्यांचा समावेश असलेले एक शिष्टमंडळाने पुणे बुसान मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशनचे प्रतीनीधी स्वरुपात उपस्थीत होऊन पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. या सामंजस्य करारावर महानगर आयुक्त, पीएमआरडीए श्री राहुल महिवाल व बुसान मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशनचे अध्यक्ष श्री. किम यांनी स्वाक्षरी केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरात कार्यरत असलेली सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क ही संस्था या दोन्ही शहरांमधील सामंजस्य कराराची समन्वय संस्था म्हणून काम करेल असे निश्चित करण्यात आले.

PMRDA ने प्रस्तावीत प्रारुप विकास आराखडा , माण- हिंजवडी ते शिवाजीनगरला जोडणारी पुणे मेट्रो लाईन 3, रिंगरोड प्रकल्प, पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि अधिवेशन केंद्र प्रकल्प आणि भोसरी जिल्हा केंद्र यासारख्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांची माहीती उपस्थीत प्रतीनिधींना दिली. त्याचप्रमाणे, बुसान मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशनच्या प्रतिनिधींनी त्यांचे विविध यशोगाथांचे सादरीकरण केले . या द्वारे दोन्ही शहरांमधील नियोजन , प्रशासन आणि अंमलबजावणी मधील यशस्वी प्रयत्नांचे बौध्दिक अदानप्रदान पार पडले.