PMPML Reward Scheme | पीएमपीएमएल आपल्या प्रवाशांना देणार शंभर रुपयांचे बक्षीस | योजना जाणून घ्या सविस्तर 

HomeपुणेBreaking News

PMPML Reward Scheme | पीएमपीएमएल आपल्या प्रवाशांना देणार शंभर रुपयांचे बक्षीस | योजना जाणून घ्या सविस्तर 

Ganesh Kumar Mule Jul 12, 2023 1:56 PM

Property Tax | मिळकत करातून महापालिकेच्या तिजोरीत 1520 कोटी जमा  | मागील वर्षीच्या तुलनेत 225 कोटी अधिक 
Dr Shashi Tharoor Pune Tour |नव्या भारतात लोकशाही धोक्यात :  डॉ. शशी थरूर
Sarkarwada | शिवसृष्टीचा पहिला टप्पा ‘सरकारवाडा’ चे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते लोकार्पण

PMPML Reward Scheme |पीएमपीएमएल आपल्या प्रवाशांना देणार शंभर रुपयांचे बक्षीस | योजना जाणून घ्या सविस्तर

|  बेशिस्त ड्रायव्हर व कंडक्टरची पुराव्यासह तक्रार करणाऱ्या प्रवाशांना मिळणार शंभर रुपये बक्षीस

|  बेशिस्त ड्रायव्हर व कंडक्टरवर होणार एक हजार रुपये दंडाची कारवाई

 

PMPML Reward Scheme |पुणे महानगर परिवहन महामंडळास (PMPML Pune) ड्रायव्हर/कंडक्टरच्या (PMP Drivers and conductors) बेशिस्त वर्तनाबाबत नागरीक, सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी यांचेकडून तक्रारी व सूचना प्राप्त होत असतात. या तक्रारीमध्ये प्रामुख्याने ड्रायव्हिंग करतेवेळी मोबाईलवर बोलणे, बसेसना रूट बोर्ड नसणे किंवा चुकीचे बोर्ड असणे, झेब्रा क्रॉसिंगवर बस थांबवणे अशा तक्रारींचा समावेश आहे. महामंडळाकडील ड्रायव्हर/कंडक्टर सेवकांच्या गैरवर्तना बाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे निराकरण होण्याच्या दृष्टीने महामंडळाने पुराव्यासह तक्रार करणाऱ्या प्रवाशांसाठी बक्षीस योजना (PMPML Reward Scheme) सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती पीएमपी प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. (PMPML Reward Scheme)

ड्रायव्हिंग करतेवेळी मोबाईलचा वापर करणे, मोबाईल कानाला लावून अगर हेडफोन द्वारे बोलणे सुरक्षिततेच्या दृष्टिने हिताचे नाही. तसेच बसला रूट बोर्ड नसणे/चुकीचा रूट बोर्ड असणे, झेब्रा क्रॉसिंगवर बस थांबवणे यामुळे प्रवाशी व नागरिकांची गैरसोय होते. सबब ड्रायव्हिंग करतेवेळी ड्रायव्हर मोबाईलचा वापर करत असल्यास व मोबाईल कानाला लावून अगर हेडफोन द्वारे बोलत असल्यास तसेच बसला रूट बोर्ड नसणे/चुकीचा रूट बोर्ड असणे, झेब्रा क्रॉसिंगवर बस थांबवले असल्याचे प्रवासी/नागरिकांना आढळून आल्यास संबंधित ड्रायव्हर/कंडक्टर सेवकास एक हजार रुपये इतका दंड आकारण्यात येणार आहे. (PMPML Pune News)

वरील प्रकारच्या तक्रारी प्रवाशांकडून प्राप्त झालेनंतर सदर तक्रारींची शहानिशा करून तदनंतरच तक्रारदार प्रवाशी/नागरिकांना शंभर रुपये बक्षीस रोख स्वरुपात मिळणार आहे. तसेच संबंधित ड्रायव्हर/कंडक्टर यांना एक हजार रुपये दंड करण्यात येणार असून त्याच्या वेतनातून सदरची रक्कम कपात करण्यात येणार आहे. (PMPML Pune)

प्रवाशी/नागरिकांनी अशा ड्रायव्हर/कंडक्टर सेवकांच्या तक्रारी बाबतचे फोटो/व्हिडीओ तसेच बस क्रमांक, मार्ग क्रमांक, ठिकाण,
दिनांक व वेळ महामंडळाच्या complaints@pmpml.org या मेलवरती व ९८८१४९५५८९ या व्हॉटसअॅप क्रमांकावरती पाठवाव्यात किंवा महामंडळाच्या नजीकच्या डेपोमध्ये पुराव्यासह तक्रारी सादर कराव्यात, असे आवाहन महामंडळाकडून करण्यात आले आहे.


News Title | PMPML will give its passengers a reward of Rs 100 Know the plan in detail