PMPML Pune | Pune Ganesh Utsav 2023 | गणेश उत्सव काळात पीएमपी कडून ज्यादा बसेसचे नियोजन | जाणून घ्या बसमार्ग
PMPML Pune | Pune Ganeshotsav 2023 | गणेशोत्सव कालावधीत पुणे शहरात नजीकच्या उपनगरातून व बाहेरगावहून गणपतीची रोषणाई,सजावट पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. या पार्श्वभूमीवर प्रवासी नागरीकांचे सोयीकरिता दरवर्षी प्रमाणे यंदाही पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (PMPML) जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. 19 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर या कालावधीत पहिल्या टप्प्यामध्ये 20 व 21 सप्टेंबर आणि 21 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर रोजी 168 बसेस जादा म्हणुन व दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रवाशी गरजेनुसार 22, 26 आणि 28 सप्टेंबर या कालावधीत 654 जादा बसेसचे गणेशोत्सवाकरीता नियोजन करण्यात आलेले आहे. (Extra Buses From PMPML For Pune Ganeshotsav 2023)
नागरिकांचे वाहतुकीचे सोयीसाठी खाली नमूद केलेल्या स्थानकावर प्रवासी गर्दीनुसार या कालावधीत खास बससेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
- दैनंदिन संचलन गणेशोत्सव कालावधीमध्ये रात्री 10.00 नंतर बंद राहणार असून रात्री 10.00 नंतर सर्व बसेस यात्रा स्पेशल म्हणून संचलनात राहणार आहेत.
- रात्री 10.00 नंतर बससेवेसाठी प्रचलित दरामध्ये रूपये 5 रुपये जादा दर आकारणी करण्यात येईल.
- गणेशोत्सव कालावधीत देण्यात येणारी ही रात्री बससेवा खास बससेवा असल्याने सर्व पासधारकांना रात्री 12.00 वाजेपर्यंत पासाची सवलत ठेवण्यात आलेली आहे. त्यानंतर कुठल्याही प्रकारचे पास चालणार नाहीत. (Extra Buses From PMPML For Pune Ganeshotsav 2023)
- गणेशोत्सव कालावधीत शहर विभागातील रस्ते सायंकाळी पोलीस खात्याकडून बंद ठेवले जातात. त्यामुळे शहराच्या आतील भागातील बससेवा पर्यायी मार्गाने चालू ठेवण्यात येईल.
गणेशोत्सव कालावधीत खालील बसस्थानकांवरून त्या समोर दर्शविलेल्या ठिकाणांपर्यंत रात्री गरजेनुसार बससेवा देण्यात येणार आहे.
- स्वारगेट बस स्थानक – कात्रज, धनकवडी, भारती विद्यापीठ, नऱ्हे, आंबेगाव, जांभुळवाडी, अप्पर इंदिरानगर, मार्केटयार्ड, सांगवी, आळंदी.
- नटराज हॉटेल / सिंहगड रोड – वडगांव, धायरी व गरजेनुसार सिंहगड, खानापूर.
- स्वारगेट डेपो बस स्थानक- हडपसर, कोंढवा हॉस्पीटल.
- महात्मा गांधी बस स्थानक – कोंढवा खुर्द, कोंढवा बुद्रुक , साळुंके विहार.
- हडपसर गाडीतळ बस स्थानक – स्वारगेट, पुणे स्टेशन, मनपा भवन, सासवड, ऊरूळी कांचन, मांजरी, थेऊर, फुरसुंगी, देवाची उरुळी.
- मोलेदिना हॉल / ससून रोड बस स्थानक – विश्रांतवाडी, लोहगाव, वाघोली, विमाननगर, वडगाव शेरी, आळंदी.
- डेंगळेपुल बस स्थानक – लोहगांव, वडगांवशेरी, मुंढवागांव/केशवनगर, शुभम सोसायटी, आनंद पार्क, तळेगांव ढमढेरे, हडपसर.
- म.न.पा.भवन मुख्य बसस्थानक व पेट्रोल पंप – भोसरी, चिंचवड, निगडी, देवाची आळंदी, देवगाव, विश्रांतवाडी, पाषाण, सुतारवाडी, बालेवाडी, म्हाळुंगे गाव, तळेगाव दाभाडे, सांगवी, पिंपळे गुरव, आकुर्डी रेल्वे स्टेशन.
- काँग्रेस भवन बस स्थानक -कर्वेनगर, माळवाडी, एनडीए 10 नं. गेट, कोथरूड डेपो.
- डेक्कन जिमखाना / संभाजी पूल कॉर्नर – कर्वेनगर, माळवाडी, एनडीए १० नं. गेट, गोखले नगर, कोथरूड डेपो.
- कात्रज बस स्थानक – स्वारगेट करीता.
- म.न.पा. पंप बस स्थानक – बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सुसगांव करीता.
- अप्पर डेपो बस स्थानक – स्वारगेट करीता.
- धनकवडी बस स्थानक – स्वारगेट करीता.
- निगडी बस स्थानक – म.न.पा. भवन करीता.
- भोसरी बस स्थानक – म.न.पा. भवन करीता.
- चिंचवडगांव बस स्थानक – म.न.पा. भवन करीता.
- पिंपरी मेट्रो स्टेशन – चिंचवड, डांगे चौक, निगडी, पिंपरी, काळेवाडी, चिखली.
दि. 28 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीमुळे स्वारगेट चौक हा बंद होत असल्याने स्वारगेट चौकातील बस थांबे खालील प्रमाणे तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरीत करण्यात आले आहेत.
मूळ बसस्थानाचे नाव – मार्ग – तात्पुरते बसेस सुटण्याचे ठिकाण
- शाहु महाराज स्थानक (स्वारगेट) – सातारा रोडने कात्रज , मार्केटयार्ड करीता लक्ष्मी नारायण चौक
- नटराज बस स्थानक – सिंहगड रोडकडे जाणे करिता – पर्वती पायथा (स्वामी समर्थ मठ) बस थांबा
- स्वारगेट स्थानका बाहेर – सोलापूर रोडने पुलगेट, हडपसर करिता – वेगा सेंटर (स्वारगेट डेपो जवळ)
- स्वारगेट स्थानका बाहेर – भवानी पेठ, नानापेठ, रास्तापेठ करिता – वेगा सेंटर (स्वारगेट डेपो जवळ)
रात्री 2.00 वाजेपर्यंतच जादा बसेसचे संचलन सुरु राहील.
दि.22 ते 28 सप्टेंबर पर्यंत प्रवाशांच्या मागणीनुसार स्वारगेट ते निगडी अशा रात्री (यात्रेकरिता) जादा बसेस सोडण्यात येतील.
गणेशोत्सव कालावधीत गणेश भक्तांच्या सोयीसाठी वरील प्रमाणे जादा बस संचलन करण्यात येणार आहे. तसेच शहरातील मुख्य रस्ते बस वाहतुकीसाठी बंद राहणार असून प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून दिवसभराच्या संचलनामध्ये नेहमीच्या शिवाजीरोड, बाजीरावरोड, लक्ष्मीरोड, टिळक रोड या रस्त्यांवरून संचलनात असलेल्या बसेसच्या मार्गामध्ये आवश्यकते नुसार बदल करण्यात येणार आहे, याची सर्व प्रवाशांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे, असे आवाहन पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून करण्यात आले आहे.