PMPML Employees | पीएमपीएलच्या बदली कर्मचाऱ्यांना सेवेत कायम रुजू करण्यावर शिक्कामोर्तब! | फरकाची रक्कम चार टप्प्यात देणार

PMPML pune

HomeBreaking News

PMPML Employees | पीएमपीएलच्या बदली कर्मचाऱ्यांना सेवेत कायम रुजू करण्यावर शिक्कामोर्तब! | फरकाची रक्कम चार टप्प्यात देणार

Ganesh Kumar Mule Aug 26, 2024 12:23 PM

7 वा वेतन आयोग: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी : डीए 3 टक्क्यांनी वाढेल
7th Pay Commission | सेवानिवृत्त सेवकांना फरकाची रक्कम अजूनही मिळेना  | 30 नोव्हेंबर पर्यंत रक्कम अदा करण्याचे मनपा प्रशासनाचे आदेश 
Pune Municipal Corporation | सातवा वेतन आयोग लागू झाल्यापासून पुणे महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तकात नोंदीच केल्या नाहीत

PMPML Employees | पीएमपीएलच्या बदली कर्मचाऱ्यांना सेवेत कायम रुजू करण्यावर शिक्कामोर्तब! | फरकाची रक्कम चार टप्प्यात देणार

| शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्यातीव्र मागणीनंतर महामंडळाच्या प्रक्रियेस सुरुवात

 

Pramod Nana Bhangire – (The Karbhari News Service) – पीएमपीएमएलच्या (PMPML) सेवकांना मूळ वेतनश्रेणीसह कायम करावे यासाठी गेल्या वर्षभरापासून सातत्याने प्रयत्नशील असलेले शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे (Pramod Nana Bhangire) यांच्या मागणीला यश आले आहे. पीएमपी सेवकांना कायम करण्याबाबत महामंडळ प्रशासनाने प्रक्रिया सुरू केली असून सातव्या वेतन श्रेणी प्रमाणे मूळ फरकाची रक्कम चार टप्प्यात देण्यात येणार असल्याबाबतचे पत्रही आज निर्गमित केले आहे. (PMPML Pune)

 

महामंडळातील 31 डिसेंबर 2023 पर्यंतच्या बदली कर्मचाऱ्यांचे शेड्युल मान्य कायम जागेवर नियुक्त करण्याबाबत शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी महामंडळाच्या कार्यालयात केलेल्या तीव्र स्वरूपाचे आंदोलन व काहीच दिवसांपूर्वी पुकारलेल्या पीएमपीएमएल च्या डेपो बंद आंदोलनानंतर प्रशासनाने सातव्या वेतनश्रेणीप्रमाणे फरकाची रक्कम चार टप्प्यात देण्यात देणार असल्याचे पत्र निर्गमित केले आहे.

 

याबाबत शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले असून महामंडळातील प्रचलित कार्यप्रणाली धोरण कार्यवाहीला अनुसरून 31 डिसेंबर 2023 पर्यंतच्या बदली कर्मचाऱ्यांचे हजेरी रेकॉर्ड तपासून त्यासंदर्भातील परिपत्रक निर्गमित करण्यात आले असून डिफॉल्ट किंवा रेकॉर्ड बाबतची छाननी व तपासणी पूर्ण झाली असून लवकरच पीएमपीएमएल चे 1700 बदली कर्मचारी कायम होणार असल्याचे शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी सांगितले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0