PMPML Employees Diwali Bonus | पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देण्याची इंटक ची मागणी
| सानुग्रह अनुदान ८.३३% व बक्षीस २१०००/- दिवाळीपूर्वी देण्याबाबत सीएमडीना दिले पत्र
इंटक च्या पत्रानुसार आजतागायत सानुग्रह अनुदान व बक्षिस थकित फरकाच्या रक्कमा परिवहन महामंडळातील कामगारांना वेळोवेळी देण्यात आलेल्या आहेत. दोन्ही महानगर पालिका त्यांचे सेवकांना सानुग्रह अनुदान व बक्षिस रक्कम देते. त्याचप्रमाणे महामंडळाच्या सर्व कायम व बदली सेवकांना सदरच्या रक्कमा द्यावयाची प्रथा पूर्व परिवहन उपक्रमापासून अस्तित्वात होती. कंपनी कायद्याखाली महामंडळाची स्थापना झाल्यानंतर मागील १६ वर्षांमध्ये सर्व कर्मचाऱ्यांना १/८ सानुग्रह अनुदान व बक्षिसाची रक्कम दोन्ही महानगर पालिकांकडून उपलब्ध झालेल्या निधितून देण्यात आलेली होती व आहे. (PMPML Pune)
सन १९९७ च्या करारातील मागणी क. ६ मधील मान्य तडजोडीप्रमाणे सानुग्रह अनुदान व बधिस देणे पीएमपीवर पुणे म.न.पा. च्या सेवकांप्रमाणे बंधनकारक आहे. तसेच इंडस्ट्रियल डिस्प्युट अॅक्ट चॅप्टर-४ प्रमाणे कस्टमरी प्रथा कायद्याखाली येत आहे. औदयोगिक न्यायालय व उच्च न्यायालय यांनीही बंधनकारक केलेले आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाकडील कर्मचारी जगातील सर्वाधिक गर्दिच्या शहरात ऊन, वारा पाऊस याचा विचार करता रस्त्यावर उतरून आपले कर्तव्य निष्ठेने बजावित आहेत. (PMPML News)