PMPML Employees Diwali Bonus | पीएमपी कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसचा प्रस्ताव पुणे महापालिका आयुक्तांच्या टेबलवर पडून!

HomeपुणेBreaking News

PMPML Employees Diwali Bonus | पीएमपी कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसचा प्रस्ताव पुणे महापालिका आयुक्तांच्या टेबलवर पडून!

कारभारी वृत्तसेवा Nov 07, 2023 2:29 PM

Diwali Advance | PMC Pune | अखेर मनपा कर्मचाऱ्यांना मिळाला दिवाळी एडवान्स!!  | बोनसचे सर्कुलर मात्र अजूनही नाही 
House Rent Allowance | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी – DA वाढल्यानंतर आता HRA 3% वाढणार!
Bonus | contract workers | मनपा कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदान देण्यास प्रशासन सकारात्मक | कामगार नेते सुनील शिंदे यांची माहिती

PMPML Employees Diwali Bonus | पीएमपी कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसचा प्रस्ताव पुणे महापालिका आयुक्तांच्या टेबलवर पडून!

| दिवाळी तोंडावर तरीही अजून बोनस नाही

PMPML Employees Diwali Bonus  | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना महापालिकेकडून दिवाळीची भेट देत बोनस देण्यात आला आहे. दरम्यान दिवाळी तोंडावर आली तरीही पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना मात्र अजूनही बोनस देण्यात आलेला नाही. याबाबतचा प्रस्ताव महापालिका आयुक्तांच्या टेबलवर गेल्या 15 दिवसापासून पडून आहे. दिवाळी आली तरी बोनस नाही म्हणून कर्मचारी धास्तावले आहेत. बोनसचा प्रस्ताव लवकर मान्य करण्याची मागणी केली जात आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळाकडील (PMPML) सर्व कायम, बदली सेवकांना सानुग्रह अनुदान ८.३३% व बक्षिस  २१०००/- दिवाळीपूर्वी देण्याची मागणी कर्मचाऱ्यानी ने पीएमपीच्या सीएमडी (PMPML CMD) कडे केली आहे.  दरम्यान कालच पुणे महापालिका सेवकांना (PMC Employees) बोनस देण्यात (Bonus) आला आहे. त्याचप्रमाणे पीएमपी सेवकांना दिलासा दिला जाणार का, असा प्रश्न पीएमपी कर्मचारी विचारत आहेत. (PMPML Employees Diwali Bonus)
पुणे महापालिका आणि पिंपरी महापालिका संचलन तुटीच्या माध्यमातून पीएमपी कर्मचाऱ्यांना बोनस देतात. पीएमपी कडून याचे प्रस्ताव दोन्ही महापालिकाना देण्यात आले आहेत. दरम्यान पुणे महापालिका प्रशासनाकडून याबाबतचा प्रस्ताव तयार करून मान्यतेसाठी आयुक्ताकडे पाठवण्यात आला आहे. मात्र गेल्या 15 दिवसापासून आयुक्तांच्या टेबलवर हा प्रस्ताव तसाच पडून आहे. आयुक्तांनी मान्यता दिल्यांनतर हा प्रस्ताव स्थायी समितीच्या माध्यमातून मुख्य सभेसमोर ठेवला जाणार आहे. यात बराच कालावधी जाणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या आधी बोनस मिळणार कि नंतर असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत लवकर निर्णय करण्याची मागणी पीएमपी कर्मचारी करत आहेत.
—-