PMPML Employees | पीएमपीएमएल चे 1748 बदली  कर्मचारी अखेर कायम | प्रशासनाकडून नेमणुकांचे आदेश जारी

Homeadministrative

PMPML Employees | पीएमपीएमएल चे 1748 बदली कर्मचारी अखेर कायम | प्रशासनाकडून नेमणुकांचे आदेश जारी

Ganesh Kumar Mule Sep 18, 2024 7:05 PM

PMPML’s bus services | ‘पीएमपीएमएल’ ने दैनंदिन उत्पन्नात ओलांडला २ कोटींचा टप्पा | १३ लाख प्रवाशांनी केला पीएमपीएमएल च्या बससेवेचा वापर
PMPML | गुन्हे दाखल करूनही पीएमपीच्या बस थांब्यावरील जाहिराती थांबेनात | पीएमपी घेणार आक्रमक पवित्रा
Women Security | PMPML bus | पीएमपीच्या कंडक्टर आणि चालकाची अशी ही माणुसकी!

PMPML Employees | पीएमपीएमएल चे 1748 बदली कर्मचारी अखेर कायम | प्रशासनाकडून नेमणुकांचे आदेश जारी

| शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या पाठपुराव्याला यश

 

PMPML Pune – (The Karbhari News Service) – पी एम पी एम एल च्या बदली कर्मचाऱ्यांना सेवेत नियमीत सामावून घेण्यासाठी, आवश्यक असलेला २४० दिवसांचा कालावधी पुर्ण होवून सुद्धा, पीएमपीएमएल प्रशासनाकडून सेवेत पुर्णत: सामावून घेतले जात नव्हते.मात्र आज अखेर 1748 पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यात येण्याबाबतचा आदेश पीएमपीएमएल च्या व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष दीपा मुधोळ-मुंडे यांनी काढला आहे. शिवसेना पक्षाच्या वतीने पुणे शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्याकडून याबाबत सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. नियमित करण्याचा आदेश निघाल्याने पी एम पी एम एल चे बदली कर्मचाऱ्यांना आता कायम करण्यात येणार आहे. दरम्यान या कर्मचाऱ्यांना ६ महिन्याचा प्रोबेशन कालावधी असणार आहे. यात कंडक्टर पासून ते विविध पदांचा समावेश आहे. (Pramod Nana Bhangire)

पीएमपीएमएल च्या कर्मचारी सेवाशर्तीनुसार कर्मचाऱ्यास नोकरीत नियमीत होण्याआधी २४० दिवस बदली कर्मचारी म्हणून सेवा बजवावी लागते. या कालावधीत कर्मचाऱ्याचे कामातील सातत्य प्रगती बघुन त्यास सेवेत कायम करणेबाबत निर्णय घेतला जातो. त्यानुसार २४० दिवसांचा कालावधी समाप्त होवून देखील पी.एम.पी.एम.एल प्रशासनाने वाहक चालक आणि अन्य संवर्गातील एकुण सुमारे 1748 कर्मचारी नियमीत केले नव्हते. हे कर्मचारी रोजदांरी पद्धतीने कार्यरत होते‌. नियमित कर्मचाऱ्यांच्या इतकेच काम करुन सुद्धा सेवेची निश्चिती नसल्याने कर्मचारी सातत्याने आंदोलनाच्या पावित्र्यात होते
या कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित करण्यात यावे,यासाठी गेल्या वर्षभरापासून शिवसेना पक्षातर्फे पी.एम.पी.एम.एल.प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता‌. दरवेळी प्रशासनाकडून आश्वासन देण्यात येत असले तरी प्रत्यक्ष कार्यवाही करण्यात येत नव्हती. पी. एम.पी.एल प्रशासन दाद देत नसल्याने पक्षातर्फे शहरप्रमुख प्रमोदनाना भानगिरे यांच्या नेतृत्वात पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांनी संप देखील पुकारण्यात आला होता. आज आदेश न निघाल्यास शिवसेना स्टाईल आंदोलन करण्याचे देखील प्रशासनास सांगण्यात आले होते. अखेर आज पीएमपीएमएलच्या व्यवस्थापकीय संचालक दिपा मुधोळ यांनी कर्मचाऱ्यांना नियमीत करण्याचे आदेश काढले.

कर्मचाऱ्यांना नियमित केल्याबद्दल या कर्मचाऱ्यांनी शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांचे अभिनंदन केले आहे.

 

यावेळी शहर प्रमुख शिवसेना शहर प्रमुख प्रमोद दादा म्हणाले की सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर पी.एम.पी.एम.एल प्रशासनाने आज हा आदेश निर्गमित केला असून जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे देखील मनापासून आभार मानतो. पी.एम.पी.एम.एल चे कर्मचारी कायम सेवेत रुजू होण्यासाठी प्रयत्नरत असलेल्या सर्व संघटनांचे, पी एम पी एम एल कर्मचाऱ्यांचे ही आभार मानतो.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0